‘बाप कुणाचा ताप कुणा…!’ नाटकाचा रंगभूमीवर धिंगाणा…
‘बाप कुणाचा ताप कुणा…!’ हे नवीन नाटक आता रंगभूमीवर आले असून या नाटकाने धिंगाणा घालायला सुरुवात केली आहे. नाटककार श्रीनिवास भणगे यांनी नाटक लिहिले आहे. नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी यांनी केले आहे. कुमार सोहोनी यांचे दिग्दर्शक म्हणून हे १२० वे नाटक आहे.
विजय गोखले, संतोष पवार, धनश्री काडगावकर, प्रशांत निगडे, वरदा साळुंके, श्रुती पुराणिक व दुर्गेश आकेरकर या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या आहेत.
‘बाप कुणाचा ताप कुणा…!’ या नाटकाचे संगीत अशोक पत्की यांनी केले असून, नेपथ्य राजन भिसे यांनी केले आहे. कुमार सोहोनी यांची प्रकाशयोजना, पूर्णिमा ओक यांची वेशभूषा आणि किशोर पिंगळे यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे.
निर्माते सचिन व्ही. यू. हे नाटक रंगभूमीवर घेऊन आले आहेत. सी. टी. निर्मित व स्मित हरी प्रॉडक्शन्स प्रकाशित हे नाटक सध्या रंगभूमीवर रसिकांचे धमाल मनोरंजन करीत आहे.
——————————-