नाट्यनिर्माते राहुल मधुकर भंडारे सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित 

नाट्यनिर्माते राहुल मधुकर भंडारे सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवाजी मंदिर, दादर, मुंबई कार्यक्रमात कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाट्य निर्माते राहुल मधुकर भंडारे यांना ‘सातारा रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित

करण्यात आले. राहुल मधुकर भंडारे हे इंडस्ट्रीत तरुण निर्माता म्हणून ओळखले जातात. ‘अद्वैत थिएटर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या निर्मितीतून जागो मोहन प्यारे या नाटकापासून सुरू झालेला प्रवास, शोध अकबर, बॉम्बे १७, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ठष्ठ, एकदा पाहावं न करून, टॉम अँड जेरी, प्यार किया तो डरना क्या, मी शारुकमांजर सुंभेकर, आरण्यक, ईब्लीस, अलबत्या गलबत्या, करून गेलो गाव ई. नाटके त्यांची गाजली असून आता सिरियल किलर, विषामृत, टाकलेलं पोर ही त्यांची रंगभूमीवर येणारी नवीन नाटकं आहेत.

IPRoyal Pawns