मागील अनेक दिवसांपासून अतुल परचुरे कर्करोगाशी झुंजत होते. इतकच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचं अनेकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. इतकच नव्हे तर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासही सज्ज झाले होते. मात्र सूर्याची पिल्ले या नाटकाची तालीम करताना अचानक खाली कोसळल्याने त्यांना काही दिवसापूर्वीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.
त्यांनी आज सोमवार रोजी अखेरचा निरोप घेतला
mumbainews24X7 अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे
ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही : अशोक सराफ
मराठी सिनेसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. एक चांगला अभिनेता मराठी सिनेसृष्टीने गमावला आहे. ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही. असं व्हायला नको होतं. फार छान नट, फार छान मुलगा होता. माझा अत्यंत जवळचा आणि आवडता मित्र होता.
जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर
अभिनेते जयवंत वाडकर यांना ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी म्हटलं की, सूर्याची पिल्ले नाटाकाची तालीम सुरु होती.. पाच दिवसांपूर्वी त्याला पुन्हा त्रास होत होता म्हणून अॅडमिट करण्यात आलं. पण तो पुन्हा येईल असं वाटलं होतं. यावर काय बोलावं हेच सुचत नाहीये. नववीत असल्यापासून आम्ही एकत्र काम करतोय. तेव्हापासूनची आमची मैत्री होती. आमचा मित्र खूप लवकर गेलाय.