“२१७ पद्मिनी धाम” हे नाटक रंगभूमीवर पुनःश्च येत आहे
नाट्यसंस्कृती निर्मित “२१७ पद्मिनी धाम” हे नाटक रंगभूमीवर पुनःश्च येत आहे. ‘नाट्यसंस्कृती’ निर्मित चंद्रशेखर सांडवे आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाला पून:रूजीवित केले आहे. वैशिष्ट्य म्हणजे आता या नाटकात एक नवीन गाण नाटकाची रंगत द्विगुणित करणार असून सम्पूर्ण जुनीच टीम असणार आहे. अभिनेत्री पूजा कातुर्डे हिचे या नाटकातील नव्याने आगमन हा लक्षणीय योग आहे. १२ ऑक्टोबरला दुपारी ४.३० वा क्रां.वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ होणार असून लगेच दौरा ही करणार आहे.
सध्या हे सस्पेन्स थ्रिलर नाटक रंगभूमीवर पुन्हा येणार, म्हणून सोशल मीडिया आणि प्रेक्षकात भरपूर चर्चा चालू आहे.
तरी रसिक मायबाप प्रेक्षक पुन्हा या नाटकाला डोक्यावर घेतील, यात शंकाच नाही.
नाट्यसंस्कृती निर्मित
चंद्रशेखर सांडवे सादर करीत आहेत रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी कथेवर आधारित
“२१७ पद्मिनी धाम” निर्माता चंद्रशेखर सांडवे, सतीश आगाशे सहनिर्माते दीप्ती ताठेले, करण भोगले, देवेंद्र नाईक
कलाकार : पूजा कातुर्डे,सुनील तांबट,सचिन नवरे,अनिकेत कदम,सुबोध वाळवणकर आणि मिलिंद शिंदे
नाट्यरूपांतर – नचिकेत दांडेकर, संकेत पाटील, दिग्दर्शक- संकेत पाटील
नेपथ्य- संदेश बेंद्रे, प्रकाश योजना – शीतल तळपदे
संगीत- शुभम ढेकळे
गीते-अनिकेत कदम नृत्ये – संदेश रणदिवे वेशभूषा – सिद्धी चिखलकर
रंगभूषा- राजेश परब, व्यवस्थापक- सर्वेश सांडवे
सूत्रधार- गोट्या सावंत