‘मास्टर माईंड’ विजय केंकरे
‘अस्मय थिएटर्स’ ही नाट्यसंस्था ‘मास्टर माईंड’ हे रहस्यमय नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे. ९ फेब्रुवारी रोजी या नाटकाचा शुभारंभ होत आहे. प्रकाश बोर्डवेकर लिखित या नाटकाची रंगावृत्ती सुरेश जयराम यांनी केली आहे. विजय केंकरे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक म्हणून विजय केंकरे यांचे हे १०६ वे नाटक आहे.
या नाटकात आस्ताद काळे व अदिती सारंगधर हे कलावंत भूमिका साकारत आहेत. या निमित्ताने ही जोडी तिसऱ्यांदा नाटकात एकत्र दिसणार आहे. या नाटकाची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून, प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य केले आहे. अशोक पत्की यांचे संगीत या नाटकाला लाभले आहे. वेशभूषेची जबाबदारी मंगल केंकरे यांनी सांभाळली आहे. अजय विचारे हे या नाटकाचे निर्माते आहेत; तर अभय भावे व शरद रावराणे हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत. श्रीकांत तटकरे या नाटकाचे सूत्रधार आहेत. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.