दिव्यांग मुलेसुद्धा बालरंगभूमीचा एक अविभाज्य भाग – नीलम शिर्के सामंत

दिव्यांग मुलेसुद्धा बालरंगभूमीचा एक अविभाज्य भाग – नीलम शिर्के सामंत

ऑक्टोबर पासून दिव्यांग बालरंगभूमी महोत्सव सुरू होणार

*’यहां के हम सिकंदर…’ अशी या महोत्सवाची टॅगलाईन*

५ ऑक्टोबरला बीडमध्ये, नंदूरबारला ८ ऑक्टोबर, जळगावला ९ ऑक्टोबर, ठाणेमध्ये १३ ऑक्टोबर, रत्नागिरीला १४ ऑक्टोबर, सोलापूरला १५ ऑक्टोबर, सांगलीला १६ ऑक्टोबर, पुणेमध्ये १७ ऑक्टोबर, कल्याणला १८ ऑक्टोबर, मुंबईत १९ ऑक्टोबर, नाशिकला २१ ऑक्टोबर, धुळेमध्ये २२ ऑक्टोबर, नागपूरला २४ ऑक्टोबर, अहमदनगरला २५ ऑक्टोबर रोजी दिव्यांग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

कोल्हापूर, सातारा, अकोला आणि परभणी या शाखांमधील महेात्सवांच्या तारखा लवकरच जाहिर करण्यात येतील. १९ ते २० ठिकाणी हा महोत्सव साजरा होणार.

दिव्यांग बालमहोत्सवासाठी धनंजय जोशी, नंदकुमार जुवेकर, दीपाली शेळके, नागसेन पेंढारकर यांची समिती नेमण्यात आली आहे.

‘यहां के हम सिकंदर…’ अशी या महोत्सवाची टॅगलाईन आहे. जवळपास ५०० शाळा व संस्था या निमित्ताने बालरंगभूमी परिषदेच्या संपर्कात आल्या.

नीलम शिर्के सामंत म्हणाल्या की, इतर बालकांप्रमाणे दिव्यांग मुलेसुद्धा बालरंगभूमीचा एक अविभाज्य भाग असल्याने त्यांनाही सामावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. काही शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात महोत्सव होणार असून, काही शाखांमध्ये लघु महोत्सव होईल. यात सर्व प्रकारच्या विशेष मुलांचा समावेश असेल. या अंतर्गत मुलांना त्यांची कला सादर करता येईल. सामान्य मुलांच्या बरोबरीने दिव्यांगांनाही कला सादर करता यावी हा या मागचा उद्देश आहे.

यात जवळपास ३५०० विद्यार्थी सहभगी होतील. १५०० हून अधिक दिव्यांग प्रेक्षक आणि ५ ते ६ हजार प्रेक्षक या महोत्सवाला हजर राहतील.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns