पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दिनांक ८ ते १५ नोव्हेंबर २०१९ या दरम्यान विविध कला आविष्कारांचा समावेश असलेल्या पु.ल कला महोत्सव २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे.
दोन विशेष कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
* दिनांक १४ नोव्हेंबर बालदिन संपूर्णपणे बालकांसाठी राखून ठेवण्यात आला असून विस्मृतीत गेलेले खेळ पुन्हा एकदा खेळण्याची संधी मुलांना मिळणार आहे. [४.०० ते ६.३० चला बालपण रंगवूया (पारंपारिक खेळ)].
*महोत्सवाचा समारोप समारंभ दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सायं. ७.३० वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे.
८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान पु.ल. कला महोत्सवाचे आयोजन; आठ दिवस सांस्कृतिक मेजवानी नवीन संचातील “कुसुम मनोहर लेले” “हिमालयाची सावली”, संगीतकार-गायक सलील कुलकर्णी यांचा संगीतमय कार्यक्रम, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे व अन्य मान्यवरांकडून पु.लं.च्या लेखांचे अभिवाचन, पारंपरिक लोककला, ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम, हस्तकला कार्यशाळा दर्जेदार मराठी चित्रपट अशी विविधांगी सांस्कृतिक मेजवानी या आठ दिवसीय महोत्सवामध्ये अनुभवायला मिळणार आहे.
राज्यभरातून अनेक मान्यवर तसेच नवोदित कलाकार महोत्सवात सहभागी होणार असून नाट्य, नृत्य, काव्य, साहित्य, लोककला, हस्तकला, चित्रपट अनेक कलाप्रकारांचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे. दिनांक १४ नोव्हेंबर बालदिन संपूर्णपणे बालकांसाठी राखून ठेवण्यात आला असून विस्मृतीत गेलेले खेळ पुन्हा एकदा खेळण्याची संधी मुलांना मिळणार आहे.
महोत्सवाचा समारोप समारंभ दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सायं. ७.३० वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार असून रात्री ८.३० वाजता नवीन संचातील “हिमालयाची सावली” या नाटकाने महोत्सवाची सांगता होईल. महोत्सवातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुले आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाणार असून महोत्सवाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन पु.ल.देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.