…तर दामोदर हाॅलसाठी उपोषणाला बसू…प्रशांत दामले

*…तर दामोदर हाॅलसाठी उपोषणाला बसू…प्रशांत दामले*

मराठी रंगभूमीची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे परळच्या दामोदर हॉल व सहकारी मनोरंजन मंडळाच्या वादात आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने हस्तक्षेप केला आहे!

२८मे परत योग्य पाऊल उचलला नाही तर दामोदर हॉल साठी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषदेत दिला!

सोशल सर्विस लीग संस्थेच्या जागेवर असलेल्या दामोदर हॉल आणि सहकारी मनोरजन  मंडळाचे प्रकरण, नोव्हेंबर 2023 पासून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर , आ प्रवीण दरेकर तसेच मंत्री मंगल प्रभात यांनी भेट दिल्यानंतर दामोदर हॉलच्या पाडकामाला स्थगिती देण्यात आली होती ! स्थगिती असतानाही सोशल सर्विस लीगने पुन्हा पाडकम सुरू केले

सहकारी मनोरंजन मंडळाने मराठी रंगभूमीची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे दाद मागितली यावर नाट्य परिषदेने पत्रकार परिषद बोलवत आपले म्हणणे मांडले यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ठाम भूमिका मांडली!

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले आणि त्यांच्यासह बाल रंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांनीही दामोदर हॉलसाठी आपणही उपोषणास बसू असे सांगितले!

परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, बाल रंगभूमीचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार  परिषदेचे प्रवक्ते व सरचिटणीस अजित भुरे ,सहकारी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे ,मंडळाचे सचिव के राघव कुमार ,ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते , अभिनेत्री लावणी नृत्यांगना मेघा घाडगे ,सहकारी मनोरंजन मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते!

 यावेळी दामोदर नाट्यगृह बचाव आंदोलनामध्ये आंदोलनाच्या सुरुवातीपासून पाठिंबा  देणाऱ्या मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष शीतल करदेकर  यांनी सांगितले की” मराठी  कलावंतांना नेहमीच गृहीत धरले जाते आणि मुंबईसारख्या ठिकाणी असलेले  दामोदर नाट्यगृह ,तेथील कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आमची संघटना आपल्या सोबत आंदोलनात या प्रकरणाचा सकारात्मक निकाल लागेपर्यंत राहील !

माई संघटनेचे कोषाध्यक्ष चेतन काशीकर यांनीही मराठी नाट्यगृह बद्दल असलेल्या अनास्थेबद्दल आपले मत व्यक्त करत काही प्रश्नही उपस्थित केले!

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

1) विधानपरिषदेत तोडकामाला स्थगिती दिलेली असताना सुद्धा तोडकाम केल आहे त्याचा निषेध

2) शाळेचे बांधकाम आणि नाट्यगृहाचे बांधकाम एकाच वेळी सुरु करून एकाच वेळी संपवणे आणि हे लिखित स्वरूपात असावे.

3) 750 आसनांचे नाट्यगृह असणे अत्यावश्यक आहे.

4) आत्ता ज्या ज्या कार्यालयाना तिथे जागा दिल्या आहेत तेवढ्याच क्षेत्राफळाची जागा नवीन जागेत द्यावी.

5) नाट्यगृहाचा वाढीव FSI नाट्यगृहासाठीच वापरला जावा.

6) दामोदर नाट्यगृहाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना पूर्वीप्रमाणेच नव्या नाट्यगृहात काम मिळावे, तोपर्यंत पर्यायी रोजगार मिळावा.

7) नव्या दामोदर नाट्यगृहात पूर्वीप्रमाणेच सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय/तालमीची जागा असावी. त्यांसाठी प्रस्तावित आराखड्यात त्याची नोंद असावी. नव्या नाट्यगृहाचे निर्माण होईपर्यंत संस्थेस वापरण्यायोग्य पर्यायी जागा मिळावी.

8) शाळा व नाट्यगृह ह्यांचे एन्ट्री गेट वेगवेगळे असावे.

9) नाट्यगृहाचे भाडे हे मर्यादित असावे.

10) नाट्यगृह तळ मजल्यावरच असावे.

ह्या सर्व मागण्यासाठी आम्ही मा मुख्यमंत्री ह्यांची भेट घेणार आहोत.

दोन्ही संस्था ह्या मराठी भाषेशी संबंधित आहेत त्यामुळे हा प्रश्न समोपचाराने सोडवावा ही अपेक्षा आहे अन्यथा परिषदेला दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी मराठी नाट्य कलाकारांना घेवून रस्त्यावर उतरावे लागेल

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns