……पण सध्या तरी त्यांचा पर डे मला परवडणारा नाही – सोहम बांदेकर
चित्रपटसृष्टीत अभिनेत्याचा मुलगा हा अभिनेता बनायचा प्रयत्न करतो. दिग्दर्शक, निर्मात्यांचा मुलगाही त्याला अपवाद नाही मात्र अशा घरात ज्या घरात आपले आई-वडील दोघांनी अभिनय क्षेत्रात एक उंची गाठली आहे त्यांचा मुलगा मात्र अभिनय क्षेत्रात न येता समर्थपणे प्रॉडक्शन हाऊस सांभाळतोय…. नव्हे त्याची दमदार पावलं पुढेच पडत आहेत. हा अतिशय लाघवी मुलगा दुसऱ्या तिसरा कोणी नसून दस्तूर खुद्द आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकर आहे. प्रोडक्शन मध्ये आपले पाय घट्ट रोवत, येत्या १८ मार्चपासून ‘घरोघरी मातीच्या चुली’ या ‘स्टार प्रवाह’ वरील वाहिनीवर रात्रौ आठ वाजता येत असलेल्या सिरीयल बद्दल खास mumbainews24X7.com चे मुख्य संपादक सचिन चिटणीस यांच्याशी सोहमने केलेली बातचीत.
बाबांनी मला आयुष्यभर खूप फ्रीडम व क्लॅरिटी दिलेली आहे त्यांनी मला तेव्हा सांगितले तुझ्या मनात जे आहे ते तू कर. मास मीडियामध्ये पदवी घेतल्यानंतर एक वेळ अशी आली होती जेव्हा मला काय करावे हे सुचत नव्हते, कळत नव्हते तेव्हा आई मला म्हणाली आपले एक प्रोडक्शन हाऊस आहे तिथे शूटिंग सुरू असते तिथे जा तुझे मन लागेल मग मी शूटिंग ला जायला लागलो तिथे रोजचे काम, काम करण्याची पद्धत कॅमेरा कसा अँगलने, कधी कुठे कसा वापरायचा ते बघितल्यावरती मला त्याचे कुतूहल वाटायला लागले. हे मला एवढ आवडायला लागली की मी रोज स्वतःच जायला लागलो.
त्यानंतर लॉकडाऊन झाला या लॉकडाऊन मध्ये मी रोज एक चित्रपट बघायचो तेव्हा मला असे वाटले की मला आयुष्यात हेच करायचे आहे. त्याप्रमाणे मी बाबांना सांगितले ते म्हणाले तुला कुठे ऑडिशन देऊन काम मिळाले तर तू करू शकतो. त्याप्रमाणे ‘स्टार प्रवाह’ वरील नवे लक्ष या मालिकेत मला ‘जय सुवर्ण’ हा रोल करता आला तेव्हा पण मला माझे मन हे सारखे सांगत होते मला जे काही करायचे आहे ते या फिल्म इंडस्ट्रीतच.
‘ठरलं तर मग’ या आमच्या मालिकेपासून मी प्रोडक्शन बघायला सुरुवात केली व माझा निर्माता म्हणून हा प्रवास इथून सुरू झाला. बाबांनी मला नेहमी सांगितले जर तू एक चांगला माणूस म्हणून कधीही कुठेही काम करशील तर त्यातून येणारे आउटपुट हे चांगलेच असणार. कधीही पैसा, प्रॉफिट डोक्यात ठेवून काम करू नकोस. चांगल्या हेतूने काम कर यश तुला मिळणारच.
आई-बाबांनी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत कॅमियो करावा हे मला मुलगा म्हणून मनापासून खूप आवडेल, पण निर्माता म्हणून विचार करायला गेलो तर ते जरा खर्चिक आहे. त्यामुळे त्यांचा पर डे लक्षात घेता सध्या तरी मला ते परवडणारे नाही त्यामुळे आई-बाबांनी सेटवर यावे छान छान इंटरव्यू द्यावेत हेच मला सध्या तरी परवडणारे आहे.