‘सम्राज्ञी’ या कलाकृतीतून स्वरसम्राज्ञीला दिग्दर्शक मयुरेश पै करणार मानाचा मुजरा

लतादीदींच्या जन्मदिनी अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स आणि लतिका क्रिएशन्स घेऊन येत आहे सम्राज्ञी.

राम, तुम्हारा चरित स्वयं ही काव्य है।
कोई कवि बन जाय, सहज संभाव्य है।

श्री मैथिलीशरण गुप्त यांच्या या काव्यपंक्ती प्रमाणे लतादीदी या भारतीय संगीताच्या ज्ञानेश्वरी आहेत, या ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा मनपूर्वक निर्मळ प्रयत्न आहे.

लतादीदींचा जीवनपट उलगडणारी ही डॉक्युमेंटरी असणार आहे. मराठीतील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

एल एम म्युझिकचे सीईओ – संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया या दोघांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे. ही डॉक्युमेंट्री मयुरेश पै दिग्दर्शित करत आहेत.

स्वरसम्राज्ञीला या कलाकृतीतून मानाचा मुजरा करण्याचा हा प्रयत्न आहे.

#सम्राज्ञी #Samradnyee #LataMangeshkar #LataMangeshkarDocumentry #Documentry #LataDidi #LetsUpp #LetsUppMarathi
#NarendraFirodiya #AnushkaMotionPictures&Entertainment #LatikaCreations

IPRoyal Pawns