जिओ स्टुडिओजचे लक्ष मराठी मनोरंजन विश्व
येणाऱ्या काळात जिओ स्टुडिओज मराठी दिग्गज कलाकारांच्या समवेत चित्रपट आणि वेब सिरीजची निर्मिती करणार आहे. यात महेश मांजरेकर, प्रशांत दामले, सुकन्या कुलकर्णी, सयाजी शिंदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, भाऊ कदम, केदार शिंदे, अंकुश चौधरी, राहुल देशपांडे, हृता दुर्गुळे, अश्या मराठीतील अनेक प्रतिभावान कलाकारांचा समावेश असणार आहे.
महत्वाचं म्हणजे यात वैविध्यपूर्ण प्रकारच्या शैलीतील प्रोजेक्ट्स असणार आहेत, अगदी कॉमेडीपासून ते थ्रिलर्सपर्यंत, सत्य घटनांवर आधारित गोष्टींपासून ते प्रेमकथांपर्यंत, ज्या सर्व मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.
यातील आगामी प्रोजेक्ट म्हणजे ‘घे डबल’ ३० सप्टेंबर, ‘गोदावरी’ ११ नोव्हेंबर, “बाईपण भारी देवा” ६ जानेवारी, ‘एक दोन तीन चार’ फेब्रुवारी२०२३ ‘उनाड’, ‘4 Blind Men'(४ ब्लाइंड मेन), ‘एका काळेचे मणी’ वेबसिरीज, ‘कालसूत्र’ वेब शो, ‘जक्कल!’ वेब शो
दरम्यान, या सर्व प्रकल्पांसंदर्भात बोलताना जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंटचे प्रमुख निखिल साने म्हणाले, “अल्पावधीतच जिओ स्टुडिओजने अनेक विविध ढंगाचे प्रोजेक्ट्स तयार केले आहेत. आणि आता ते प्रदर्शित करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहेत. मराठीतील सर्वोत्तम अश्या प्रतिभावान कलाकारांसोबत आम्ही याची निर्मिती केली आहे. वेगवेगळ्या कथा आणि त्यांची उत्तम मांडणी पाहता, या दर्जात्मक कलाकृती प्रेक्षकांचं मनोरंजन करतील याची आम्हांला खात्री आहे. आणि याचबरोबर येणाऱ्या काळात अजून नवनवीन प्रोजेक्ट्स तयार करण्याचा आणि मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा मानस आहे .”