TVF ची ‘वेरी पारिवारिक’ सिझन २ चा ट्रेलर प्रदर्शित! ९ मेपासून हसण्याचा नवा धमाका

TVF ची ‘वेरी पारिवारिक’ सिझन २ चा ट्रेलर प्रदर्शित!
९ मेपासून हसण्याचा नवा धमाका

प्रेक्षकांचा प्रतीक्षा संपली! भारतातील आघाडीच्या कंटेंट क्रिएटर्सपैकी एक असलेल्या ‘द वायरल फीवर (TVF)’ ने आपल्या बहुप्रतिक्षित कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे. पहिल्या सिझनने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि आता हा शो अधिक हास्य, मेटा मॅडनेस आणि कौटुंबिक धमाल घेऊन परतला आहे. या शोचा प्रीमियर ९ मे रोजी होणार असून, दर आठवड्याला नवीन एपिसोड प्रदर्शित होणार आहे.

सिझन 2 ची सुरुवात तिथूनच होते जिथे सिझन 1 संपला होता. शेलीची कहाणी आता एका शोमध्ये बदलू लागते, ज्यामुळे हसवणारे आणि हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळतात. ट्रेलरमध्ये आपल्याला त्या अनोख्या कथनशैलीची आणि भावनिक गुंतागुंतीची झलक पाहायला मिळले, ज्यामुळे सिझन 1 सुपरहिट ठरला होता.

सिरीजचे क्रिएटर आणि दिग्दर्शक वैभव बंडू म्हणतात, “‘वेरी पारिवारिक’ चा दुसरा सिझन ‘द गॉडफादर (पार्ट ३)’ आणि ‘शिंडलर्स लिस्ट’ पेक्षा ही जास्त मजेशीर आहे. मला थेरपी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण मी त्याऐवजी हा शो बनवला! या ट्रेलरचा सगळ्यांनी आनंद घ्या, तो पूर्णपणे ऑर्गेनिक आहे आणि आमच्या स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतलेला आहे.”

आता TVF च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर या सिझनचा ट्रेलर उपलब्ध आहे. लवकरच तो पाहा आणि आपल्या ‘थोडी टेढी-मेढी पण मनाशी जोडलेली’ फॅमिलीला पुन्हा भेटा, या वेळी अधिक मोठ्या आणि मजेदार अंदाजात!

TVF ने भारतीय मनोरंजनसृष्टीत स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. असा दुसरा कोणताही प्रॉडक्शन हाउस नाही जो आपल्या प्रेक्षकांची नाडी इतक्या अचूकपणे ओळखतो. २०२४ हे वर्ष TVF साठी धमाकेदार ठरले – ‘सपने Vs एव्हरीवन’, ‘वेरी पारिवारिक’, ‘पंचायत सिझन ३’, ‘कोटा फॅक्टरी सिझन ३’ आणि ‘गुल्लक सिझन ४’ यांसारख्या शोज नी फक्त लोकांची मने जिंकली नाहीत, तर अनेक पुरस्कारही पटकावले. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलेसे करणारा TVF आज भारतातील टॉप कंटेंट क्रिएटर्सपैकी एक मानला जातो. आणि येत्या काळातही दमदार कहाण्यांची कमतरता यांच्याकडे नसेल.

IPRoyal Pawns