‘द काश्मीर फाइल्स’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा

‘द काश्मीर फाइल्स’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून त्यांना ठार मारण्याच्या धमख्या येण्यास सुरुवात झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे गृह मंत्रालयाने विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

बॉलिवूड चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ रिलीज झाल्यापासून एकीकडे अनेकांना हा चित्रपट आवडत आहे तर दुसरीकडे अनेकांनी या चित्रपटाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. काही राज्यांनी चित्रपट करमुक्त केला आहे तर काही राज्य लवकरच याची घोषणा करणार आहेत.

‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट काश्मीर पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर आधारित आहे. या चित्रपटावरून देशात समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. याशिवाय विवेक यांना सतत धमकीचे फोन येत आहेत. येणा-या धमकीचे कॉल्स आणि मेसेजची संख्याही वाढत आहे. या मेसेज आणि कॉल्समधून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.

याच आधारे गृह मंत्रालयाने विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

 

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns