अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विश्वस्त मंडळातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात कार्यकारी समितीने शिफारस केलेल्या ४ नावांची उदय सामंत, मोहन जोशी, अशोक हांडे ,गिरीश गांधी यांच नियामक मंडळ सभेत ४ ऑक्टोबर २१ रोजी विश्वस्तपदी बहुमताने निवड करण्यात आली. नियामक मंडळ सभेस ५९ पैकी एकूण ४१ सदस्य हजर होते तर ७ सदस्यांनी आपला पाठिंबा पत्राद्वारे कळविला होता.
“विश्वस्तांचा कोरम आता पूर्ण झाल्याने विश्वस्त जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य असेल. त्यामुळे यापुढे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या हिताला बाधा येईल असे वक्तव्य कोणी केल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल” असा इशारा अध्यक्ष नरेश गडेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
सभेत विश्वस्त शरद पवार यांनी सांस्कृतिक क्षेत्र व नाट्यक्षेत्र पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असल्याचे नाट्य परिषदेत असलेला वादावर बोलताना केला. ते पुढे असे म्हणाले ज्यांना कुणाला वाद घालायचे त्यांना वाद घालू द्या. ज्यांना कोणाला मुलाखती छापायच्या त्यांना छापुद्यात. नाट्य परिषदेच्या व नाट्य क्षेत्राच्या या कामासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे. असे सभेला त्यांनी आश्वासीत केले.