“त्या पत्रातील निर्देशासंबंधात शरद पवारां कडून ‘खुलासा’ मागविण्यात आला आहे मात्र तो अद्यापपर्यंत मला प्राप्त झालेला नाही.” – प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे

शरदचंद्र पवार यांनी विश्वस्तांच्या सभेत ठराव झाल्याशिवाय कोणतेही निर्देश देणे, हे चुकीचे व घटनाबाहय असून त्याची दखल घेता येणार नाही, त्यांनी गडेकरांना पाठवलेल्या पत्रातील निर्देशासंबंधात त्यांच्या कडून ‘खुलासा’ मागविण्यात आला आहे, मात्र तो अद्यापपर्यंत मला प्राप्त झालेला नाही.” नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष नरेश गडेकर यांना कार्यकारी आणि नियामक मंडळाची सभा घेण्यात यावी असे पत्र पाठवले होते त्यावर पत्राद्वारे शरद पोंक्षे यांनी हे उत्तर दिले. त्याप्रमाणे अध्यक्ष नरेश गडेकरांनी सदरहू सभा घेण्यासाठी प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांना ई-मेल द्वारा पत्र पाठवले मात्र अशी सभा घेण्यास त्यांनी नकार देत नरेश गडेकरांनी ती घेतली तर फौजदारी गुन्हा दाखल करू असे उलटपक्षी त्यांना सुनावले.

मात्र अध्यक्ष या नात्याने गडेकरांनी नियामक मंडळ आणि कार्यकारी समिती यांच्या सभेचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता करण्यास सांगितले असून शरद पवार आणि शशी प्रभू या दोघांना आमंत्रित केले आहे. त्या सभेत रिक्त विश्वस्त पदांबाबत चर्चा करून निवड तसेच इतर अनेक प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सर्व नियामक मंडळ आणि कार्यकारी सदस्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

यावरून २१ सप्टेंबर २०२१ ला नरेश गडेकर यांना पाठवलेल्या पत्रात प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे नरेश गडेकरांना नियामक मंडळ सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई. असे संबोधून पुढे म्हणतात की आपण ‘कार्यकारी समिती’च्या लागोपाठ २ सभांना उपस्थित न राहिल्यामुळे आपले कार्यकारी समितीचे सदस्यत्व’ घटनेच्या तरतूदीप्रमाणे आपोआपच रद्द झालेले असून तत्संबंधीचा बदल अर्ज मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे आपण १४ सप्टेंबर रोजी ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्राचे अवलोकन
करता असे लक्षात येते की, सदरहू पत्रातील मजकूर चुकीच्या माहितीवर आधारित असून दिशाभूल करणारा आहे.

आपण १८ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतलेल्या तथाकथित अवैध ‘विशेष नियामक मंडळा’च्या सभेच्या अनुषंगाने दाखल केलेला बदल अर्ज हा वादातीत असून प्रलंबित आहे व आजतागायत त्यात आपण ‘अध्यक्ष’ असल्यासंबंधी कोणतेही ‘न्यायिक आदेश’ मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी पारित केलेले नाहीत. त्यामुळे आपणांस ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’ न्यासाचे अध्यक्ष’ म्हणून मला आदेश देण्याचे कोणतेही अधिकार प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आपल्या पत्राची कायदेशीर दखल घेता येणार नाही.

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’ न्यासाच्या घटनेच्या तरतूदीप्रमाणे ‘अध्यक्ष’ व ‘प्रमुख कार्यवाह’ हे न्यासाच्या विश्वस्त मंडळाचे ‘पदसिद्ध विश्वस्त’ आहेत. त्यामुळे दिनांक ६ एप्रिल २०१८ पासून आजतागायत मी स्वतः व नवनाथ मच्छिंद्र कांबळी हे न्यासाचे ‘पदसिद्ध विश्वस्त’ आहेत. त्यामुळे शरदचंद्र पवार (तहहयात विश्वस्त) व शशी प्रभू (तहहयात विश्वस्त) यांनी विश्वस्तांच्या (विश्वस्त मंडळाच्या) सभेत ठराव झाल्याशिवाय कोणतेही निर्देश देणे, हे चुकीचे व घटनाबाहय आहे. त्यामुळे शरदचंद्र पवार (तहहयात विश्वस्त) व शशी प्रभू (तहहयात विश्वस्त) यांनी दिनांक १३ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेले निर्देश हे विश्वस्तांच्या सभेत ठराव पारित न झाल्यामुळे घटनाबाहय आहेत व त्याची दखल घेता येणार नाही.

आपण ‘अध्यक्ष’ नसल्यामुळे आपणांस अहवाल देणे व आपण सभा बोलविणे असे कोणतेही अधिकार आपणांस प्राप्त होत नाहीत. या व इतर उपरोक्त कारणामुळे, आपले दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजीचे पत्र हे पुर्णत: दिशाभूल करणारे असून आपणाविरुद्ध ‘फौजदारी’ कार्यवाही सुरु करण्यास पात्र आहे.

सबब. कोणत्याही सभेचे आयोजन करण्याचा अवैध प्रयत्न आपण करु नये. शरदचंद्र पवार (तहहयात विश्वस्त) व शशी प्रभू (तहहयात विश्वस्त) यांनी दिनांक १३ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या पत्रातील निर्देशासंबंधात त्यांच्याकडून दिनांक १६ सप्टेंबर २०२१ रोजी पत्र पाठवून ‘खुलासा’ मागविण्यात आला आहे व तो अद्यापपर्यंत मला प्राप्त झालेला नाही.

नवनाथ मच्छिंद्र कांबळी व मी स्वतः ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद न्यासाचे आम्ही ‘पदसिद्ध विश्वस्त’ आहोत आणि विश्वस्तांना काढण्याचा अधिकार आपणांस (नियामक मंडळ सदस्यास) न्यासाच्या घटनेच्या कोणत्याही तरतूदींनूसार प्राप्त झालेला नाही. या व इतर उपरोक्त कारणांमुळे ‘पदसिद्ध विश्वस्त’ आणि ‘प्रमुख कार्यवाह’ म्हणून मी आपणांस असे निर्देश देतो की, अशा त-हेचे वाद उत्पन्न करुन ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’ न्यासाच्या कार्याचा वेळ व पैसा वाया घालविण्यास भाग पाडू नये.
आता ६ ऑक्टोबरला सभा होते का त्यात काही अडचणी निर्माण होतात हे येणारा काळच ठरवेल.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns