**उद्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात १४४ कलाम लागू, १५ दिवस संचारबंदी** – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संचारबंदीच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
कोरोना विरोधातल्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात
झालीय
आज राज्यात ६० हजार २१२ कोरोनाग्रस्त
क्षमतेपेक्षा अधिक भार पडल्यानं कोरोना चाचण्यांना
वेळ लागतोय
राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय
कोरोना प्रादुर्भावामुळं वैद्यकीय सुविधांवर भार पडलाय
राज्यात सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा रुग्णांसाठी वापर
सध्याची वेळ निघून गेली तर अवस्था आणखी बिकट
होईल
इतर राज्यतून हवाई मार्गानं ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे
वेळप्रसंगी ऑक्सिजन वाहतुकीसाठी लष्कराची मदत मागितली आहे
जीएसटी परताव्यासाठी मुदतवाढ द्या, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
लस दिल्यानंतर प्रतिकारशक्ती यायला काही दिवस जावे लागतात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्था तोकडी पडताना दिसतेय
उपचार करण्यासाठी डॉक्टरांचीही गरज
नव्यानं उत्तीर्ण झालेल्या वैद्यकीय विदयार्थ्यांची मदत
घेणार
कडक पावलं उचलण्याचा क्षण आला आहे
नागरिकांचे जीव वाचवण्याला सरकारचं प्राधान्य
नाईलाजाने काही बंधनं घालावी लागणार आहेत
**उद्या रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवस राज्यात संचारबंदी**
गरजूंना ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत
परवानाधारक फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये देण्यात येणार
गरिबांना शिवभोजन थाळी पुढील १ महिना मोफत देणार
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देण्यात येणार
मेडिकल, किराणा दुकाने सुरु राहणार
रेल्वे, लोकल, बससेवा सुरु राहणार
खत दुकाने, शीतगृहे, शेतीची कामे सुरु राहणार
औद्योगिक क्षेत्रातले उद्योगधंदे सुरु
गरिबांना एका महिन्यासाठी तीन किलो धान्य मोफत
अत्यावश्यक सेवे अंतर्गत यांना सूट मिळणार
सर्व वैद्यकीय सेवा
सार्वजनिक वाहतूक
दूध डेअरी
प्राण्यांसंदर्भातील सेवा
मान्सून पूर्व कामं
सर्व बँका
माल वाहतूक
टेलिकॉम कंपन्या
किराणा
बेकरी
फळ विक्रेता
मान्यताप्राप्त माध्यम
पेट्रोल पंप
एटीएम
इलेक्ट्रिक आणि गॅस सप्लाय
सर्व प्रकारच्या सुरक्षा एजन्सी
ई-कॉमर्स
टपाल कार्यालय
आपत्कालीन कक्ष
बंदरे आणि वाहतूक
धान्याची गोदामे
शीतगृहे
दूतावास
सर्व सरकारी कार्यालये
शेतीची कामे
कस्टमचे कर्मचारी
लसीकरणाचे कर्मचारी
अत्यावश्यक कच्चा माल पुरवणारे
पाणी
पुरवठा
शेअर बाजार
सफाई कर्मचारी
उद्योगधंदे
खाजगी माल वाहतूक बंद, तर माल वाहतूक सुरू
जिम, जलतरण तलाव बंद तर भाजी बाजार फळ विक्रेते सुरू
फेरीवाल्यांचे स्टॉल बंद तर पार्सल सेवा सुरू