पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चे पदवीधर असणारे बंगलोरचे डॉक्टर रमेश कामथ यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या विषयावर आधारित ‘अप्सरा धारा ‘ हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन हे डॉक्टर रमेश कामथ यांचे आहे .
मंगलोर येथील मास्टर सार्थक शेणॉय आणि कुमारी स्वाती भट या गुणीबालकलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. डॉक्टर दयानंद पै यांनी या चित्रपटात ‘दयानंद’ ही एक खास भूमिका केली आहे . ”अप्सरा धारा ‘ हा इजिप्त मध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट आहे आणि यात काही थ्री डी दृश्येही चित्रित केली आहेत . ‘यशाला कधीच शॉर्टकट नसतो ‘, असा संदेश अधोरेखित करणारा हा चित्रपट मुलांसाठी आणि पालकांसाठी प्रेरणादायी चित्रपट ठरणार आहे .
बहुभाषिक चित्रपट कलावंत गोपीनाथ भट हे या चित्रपटात ग्राम प्रमुखाची भूमिका करत आहेत आणि सुप्रसिद्ध नाट्यकलावंत पी रोहिदास नायक हे आदर्श शिक्षक ‘पिंटो ‘ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत . दगडाचे सोन्यात रूपांतर करणाऱ्या परिकथेचा रहस्यमय घटक सुद्धा या चित्रपटात तुम्हाला आनंद देणार आहे .
हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाची निवड कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘बाल चित्रपट ‘विभागासाठी झाली आहे आणि हा चित्रपट बालदिनाच्या निमित्ताने १४ नोव्हेंबरला दाखवला जाणार आहे.