नियामक मंडळाच्या सभेत प्रसाद कांबळी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव…

बुधवारी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडे पायउतार होण्याची मागणी करण्यात आली असून आता कांबळी यांना पंधरा दिवसांमध्ये नियामक मंडळाची विशेष बैठक घेऊन बहुमत सिद्ध करावे लागेल अन्यथा त्यांना अध्यक्षपद सोडावे लागेल हा अविश्वास ठराव मंजूर झाल्यास नियामक मंडळातून नवा अध्यक्ष निवडून नवीन कार्यकारणी स्थापन होऊ शकेल.
बुधवारी सकाळी सुरू झालेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक तब्बल संध्याकाळपर्यंत प्रचंड वादावादीत सुरू होती. करोना काळामध्ये कार्यकारिणीने स्वतःच्या अधिकारात १ कोटी २० लाख रुपयांच्या मदत निधीचे वाटप केले त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर सुमारे ७० टक्के विषय नामंजूर करण्यात आल्याचे तसेच अध्यक्षानी केलेल्या कथित गैरव्यवहाराचाही उहापोह झाल्याचे कळते.
मार्च २०२० मध्ये झालेल्या बैठकीनंतर नियामक मंडळाची आत्तापर्यंत एकही बैठक झाली नाही तसेच कार्यकारिणीच सगळे निर्णय घेत असल्याचे प्रकरण विश्वस्थां पर्यंत पोहोचले होते यावरूनच अध्यक्षांवर मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर ३४ सदस्यांनी सह्या केल्याचीही माहिती मिळत आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns