माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर पाडून त्याजागी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाट्यमंदिर उभारणार – प्रसाद कांबळी

माटुंगा येथील नाट्यप्रेमीं मध्ये स्थान मिळवलेले यशवंत नाट्य मंदिर यास तीस वर्षाहून अधिक काळ झाल्याने त्याची दुरुस्ती आवश्यक भासू लागल्याने त्या दुरुस्तीचा खर्च काढल्यास त्याऐवजी या जागेवर एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुसज्ज असे नाट्यमंदिर बांधावे असा ठराव सोमवारी झालेल्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये संमत झाला त्यानुसार लवकरच पुढील कारवाई होऊन यशवंत नाट्य मंदिर च्या जागेवर, यशवंत नाट्य मंदिर पूर्णपणे पाडून त्या जागेवर एक अतिशय सुरेख असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाट्यमंदिर उभारले जाईल तसेच 2019 मध्ये राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ज्या हौशी नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला त्यांना नाट्यपरिषद मदत करणार असून 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी सर्व संस्थांना, 2019 रोजी झालेल्या स्पर्धेत सहभागी संस्थांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतला असून सहभागी संस्थांनी संस्थेचे नाव, नाटकाचे नाव, केंद्र, सादरीकरणाची तारीख, वेळ, संपर्क, ई-मेल आयडी, आणि संस्थेचे बँक अकाउंट डिटेल्स तसेच आपल्या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतल्याचे पुरावे नाट्यपरिषदेच्या संकेतस्थळावर पाठवावेत असे आवाहन अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी झूम ॲप वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

*सतीश लोटके यांचा बोलावता धनी कोण हे लवकरच कळेल*

“तसेच या पत्रकार परिषदेमध्ये सतीश लोटके यांनी नाट्यपरिषदेच्या व अध्यक्ष या नात्याने माझ्यावर जे काही कथित आरोप केले आहेत त्याची कॉपी मला अजून मिळालेली नसून मिळाल्यानंतर ती वाचून या कथित आरोपात कितपत तथ्य आहे हे बघून जर सतीश लोटके यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आल्यास विश्वस्त मंडळ, नियामक मंडळ, कार्यकारी समिती व अध्यक्ष या नात्याने, आम्ही सर्वजण मिळून यावर विचार विनिमय करून पुढील दिशा ठरवू”असे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ‘मुंबई न्यूज’ ने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns