०७ जून २०२०, रविवार बातम्या

०७ जून २०२०, रविवार बातम्या

– शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कोविड-योद्ध्यांचा मानपत्र देऊन गौरव.

– अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याचं अनेक इंग्रजी, हिंदी वेबसाईट्सवर वृत्त, भारत सरकारकडून अद्याप कोणताही दुजोरा नाही.

– भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक पूर्ण; चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न.

– देशात गेल्या सात दिवसात 62 हजार लोकांना कोरोनाची लागण, देशात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 36 हजारावर तर राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 80 हजारांवर.

– खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड्स कागदावरच; तर, राजीव बजाज हे कोविड किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत; देवेंद्र फडणवीस यांचा टोला.

– मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार, अत्यावश्यक सेवांसोबतच इतर नागरिकांसाठीही सेवा उपलब्ध; राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्णय.

– अनलॉक 1 मध्ये सूट न मिळाल्यानं पुणे, नागपूर, वर्ध्यात सलून व्यावसायिकांचं आंदोलन, आर्थिक पॅकेजची मागणी, काळ्या फिती लावून आंदोलन.

– वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासूनच सुरु होणार, विद्यार्थ्यांना गावाजवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये परीक्षा देण्याची मुभा.

– तळकोकणात दोडामार्गच्या मोर्ले गावात टस्कर हत्तीचा थरार, दैव बलवत्त म्हणून 3 जणांचा जीव वाचला, बागायती शेती, वस्तीचंही नुकसान.

– लांसेट या प्रतिष्ठीत सायन्स मॅगझिनने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबतचा अभ्यास मागे घेतला, 197 वर्षीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns