फेसबुक द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद
आपण संयम, धैर्य व जिद्दीने लढतो आहे.
महाराष्ट्राच्या या लढाईला आज सहा आठवडे पूर्ण होत आहेत.
महाराष्ट्राने, शत्रूसमोर दिसत असता एक घाव दोन तुकडे केले असते, पण न दिसणाऱ्या या शत्रूंशी आपला लढा सुरू आहे.
८० ते ९० टक्के लोकांपर्यंत आपण रेशन पुरावलंय.
कोणतेही लक्षण कृपया लपवून ठेवू नका, लक्षणे दिसल्यास कृपया तातडीने दवाखान्यात जा.
कोरोना झाला म्हणजे सगळं काही संपलं असे नाही.
मास्क आणि सोशल डिस्टनसिंग द्वारे आपण विषाणूला दूर ठेवू शकतो.
पी पी इ किटचा तुटवडा आहे मात्र आपण पुरवठा करतो आहोत.
आकडेवारी खालती आली म्हणून आपण गाफील राहून चालणार नाही.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगधंद्यांना अटी शर्तींसह परवानगी देतोय.
अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून काही सवलती देत आहोत.
जिल्हा बंदी कायम असेल, पण मालवाहतुकीला परवानगी असेल.
मुंबई-पुण्यात आत्तातरी वृत्तपत्र वितरण योग्य होणार नाही.
घरात बसून कंटाळला असाल तर या दोन नंबर वर फोन फिरवा –
मुंबई महानगर पालिका व बिर्ला 1800 120 820050
अदिवासी विभाग, प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुलता 1800 102 4040
घरगुती हिंसा होत असेल तर 100 नंबर फिरवा.