मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे…
मरकजमधला प्रकार संतापजनकच. ज्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा ह्या आपत्तीत काही कारस्थान रचावं असं वाटत असेल तर अशा लोकांवर उपचार करण्यापेक्षा गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. ह्या असल्या लोकांना वेगळं काढून त्यांना फोडून काढ़तानाचे व्हिडीओज व्हायरल झाले पाहिजेत. ह्या धर्मांधांनी लक्षात ठेवावं संचारबंदी थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच. हे जे मुल्ला-मौलवी कुठे आहेत ते बघायचं आहे.
-लोकांमधील संभ्रम सरकराने दूर करावा.
-माध्यमांचंही अभिनंदन आणि आभार, पत्रकार सर्वत्र फिरून बातम्या गोळा करत आहेत, मात्र त्यांनाही कुटुंब आहे.
-पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करणं योग्य नाही, पोलिसांकडून चुका होऊ शकतात, मात्र ही वेळ नाही.
-हात जोडून विनंती आहे, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल.
या दिवसामध्ये जर कोणी काळाबाजार करत असेल त्यांना फोडून काढला पाहिजेे, तुम्हाला कुटुंब आहेत की नाही? तुमच्याही अंगलट येईल.
समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे, नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवं.
पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता.