कोरोनाची लढाई आपण जिंकू हा आत्मविश्वास माझ्यात आहे तुमच्यातही असुदे, जगाच्या इतिहासात याची नोंद होणार आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

* विरोधी पक्षनेत्यांची साथ मिळते आहे.
* ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची परिस्थिती बघवत नाही.
* राज ठाकरे यांच्याकडून काही सूचना आल्यात.
* मी पंतप्रधानांशी बोलतोय, गृहमंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलतोय. विरोधी पक्षांचे नेते हे देखील या प्रसंगात आमच्याबरोबर आहेत.
* संपूर्ण देशात इतर राज्यातील कामगार आपापल्या राज्यात जायला उत्सुक आहेत त्यांना एक सांगावं वाटते की त्यांनी आहे तिथेच थांबावं.
* १६३ ठिकाणी यांच्यासाठी केंद्रे सुरू केली आहेत अजून काही सुरू होतील.
* कुठेही मदत पाहिजे असेल तर सीएम ऑफिसला सांगा आम्ही मदत करू.
* साखर कारखान्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांची, ऊसतोड कामगारांची काळजी घ्या.
* सोयी सुविधांसाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास चालू असली तरी लोक दुर्लक्ष करत आहेत.
* पोलीस यंत्रणेला सहकार्य करा. बाहेर पडू नका
* संयम ठेवा, कुठेही वर्दळ होऊ देऊ नका.
* सरकारला कठोर पाऊल उचलायला लावू नका.
* मी विनंतीच करतोय अजून.
* काही ठिकाणी मोफत जेवण सुरू केलय.
* शिवभोजन पूढील ३ महिने ५ रुपयात आहे
* गेले काही दिवस कस्तुरबा आणि नायडू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसोबत बोललो ते गोंधळलेले नाहीत. त्यांच्याशी बोलल्यावर आपलेच मनोधैर्य वाढवतात ते.
* डॉक्टर- कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा. त्यांचा अभिमान वाटतोय.
* ही मंडळी २४ तास हा धोका पत्करतात. आता तुम्ही त्यांचं काम वाढवू नका त्यांना सहकार्य करा.
* कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे अपेक्षेप्रमाणे वाढत राहील.
* खाजगी डॉक्टरांना सूचना – सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया असेल तर एक्स रे करायला लावा. जर संशय आला तर कोरोना साठी असलेल्या यंत्रणेकडे पाठवा.
* पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची लक्षणे प्राथमिक स्तरावर आहेत तोवर त्यावर इलाज करणे महत्वाचे आहे
* जर कोणी बाहेरगावी जाऊन आलेले असाल तर त्यांनी स्वतःहून विलगीकरण व्हावे.
* हायरिस्क ग्रुप कडे काळजीने बघावे लागेल. यात मधुमेह, रक्तदाब, गरोदर माता, लहान बाळ हे येतात, या लोकांना जपावे लागेल.
* गुणकाराचा काळ हाच आहे याचं काळात आपण या रोगाची वजाबाकी करूया. यात आपण नक्की जिंकू फक्त संयम ठेवा.
* जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही, हे पुन्हा सांगतो
* तुम्ही फक्त घरात रहा, घराबाहेर तुमचं सरकार खंबीर आहे.
* कुटुंबियांसोबत वेळ घालवा. गाण्यांच्या भेंड्या खेळा, कॅरम खेळा. आनंदी रहा.
* जिद्द ठेवा, आपण नक्की जिंकू, हे ही दिवस जातील.
* याची नोंद जगाच्या इतिहासात होणार आहे. ही लढाई आपण जिंकू हा आत्मविश्वास माझ्यात आहे तुमच्यातही असुदे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns