निर्माता संतोष कणेकरांचा ‘झी मराठी नाट्य गौरव २०२०’ च्या ‘परीक्षकांच्या’ निकालाबद्दल विरोध.

निर्माता संतोष कणेकरांच्याच शब्दात…..
हल्ली कुठल्याही गोष्टीवर कलाक्षेत्रातील व्यक्तींनी विरोध, निषेध किंवा वक्तव्य केलं की, ते स्वतःच्या किंवा त्याच्या कलाकृतीच्या प्रसिद्धीसाठी केलं जातंय असं समजणाऱ्या माझ्या सगळ्या बांधवाना ही नम्र विनंती आहे की अश्या विचाराने खालील मजकुराकडे पाहू नका.
हे मी बोलतोय कारण, मी आज जो *विरोध दर्शवणार* आहे तो *’झी मराठी नाट्य गौरव २०२०’* च्या *’परीक्षकांच्या’ निकालाबद्दल* माझ्या *’अथर्व’* संस्थेच्या वतीने *’झुंड’* या नाटकाचा स्पर्धेचा अर्ज मी ऑनलाइन भरला आणि आयोजकांनी मला निर्माता या नात्याने अर्ज भरताना माझ्या परवानगीने मी कोणाला म्हणजेच ( *लेखक,दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ* ) कुठल्या *नामांकनासाठी* या स्पर्धेत माझ्या नाटकाच्या वतीने स्पर्धक म्हणून पाठवू इच्छितो हे त्यांनीच विभागवारी केलेल्या गटांमध्ये माझ्या इच्छेचे नाव नमूद करण्यास सांगितले असताना, परीक्षकांनी स्वतःला वाटलं म्हणून मी *नमूद न केलेल्या विभागात* माझ्या *कलावंताचं नामांकन* करून *स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन* केले आहे, यावर *परीक्षक अजित भुरे* यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच म्हणणं अस होतं की *आम्हाला तो सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागात समाविष्ट करून घ्यावा असं नाही वाटलं पण आम्हाला तो नाटकातील इतर पात्रांसोबत ज्या पद्धतीने त्यांच्यातील एक होऊन छान काम करतो, नाटकाची गोष्ट पुढे घेऊन जातो, म्हणून आम्ही त्याला सहाय्यक अभिनेता विभागामध्ये नामांकन दिलं, तुम्हाला, मी लिहून दिलेल्या विभागात जर त्याची निवड करायची नसेल तर माझी हरकत नाही, तो परीक्षक म्हणून तुमचा निर्णय मी मान्य करतो. पण ज्या विभागासाठी मी त्याचं नावच दिलं नव्हतं तिथे तुम्ही त्याचा विचार करूच कसा शकता आणि असं केलेले तुम्हाला अयोग्य वाटत नसेल तर मग अर्जामध्ये एवढे रकाने भरण्याची जबाबदारी तरी का निर्मात्याला देता मग फक्त नाटकाचं नाव, लेखक, दिग्दर्शक यांची नावं आणि त्यांची परवानगी घेऊन खाली फक्त एवढं लिहा. स्पर्धेच्या निकालाबाबतचे सर्व हक्क परीक्षकांना असतील. जे आताही लिहिलेले आहे पण ते केवळ मी ज्या कलावंतांची तुमच्याकडे ज्या विभागासाठी नावासहित शिफारस केलेली आहे त्या विभागासाठी. पण माझ्याकडून न दिलेल्या विभागात निवड करण्याचा अधिकार तुम्हाला कसा असू शकतो. उद्या तुम्ही पार्श्वसंगीतात तबला वाजवणाऱ्याला संगीत विभागातलं उत्कृष्ट संगीतकाराचं पारितोषिक द्याल.
अर्जामध्ये निर्मात्याकडून विभागवार कलावंतांची नावं मागवून तुम्ही निर्मात्याचा अपमान करता, त्या कलावंताच्या अभिनय क्षमतेवर शंका घेता, आणि इतर नाटकातील त्याच विभागातील योग्य कलावंतावर अन्याय करता असं नाही का वाटत ?
तरी अश्या मनमानी विचारांच्या स्पर्धेच्या परिक्षकांचा मी निषेध करतो.* एखाद्या स्पर्धेचे नियम हे स्पर्धक म्हणून मला जसे बंधनकारक आहेत तसेच ते परीक्षक म्हणून परिक्षकांनाही बंधनकारक असायला हवेत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns