“आज लागू, तेंडुलकर, निळू भाऊ , पुलं, कुसुमाग्रज यांची उणीव भासतेय. पण यापैकी कोणीही नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत कारण परिषदेची अध्यक्षीय निवडणूक.
यापुढे नाट्यसंमेलन अध्यक्ष ही निवडणूक नको, जेव्हा १०० व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मला गळ घालण्यात आली तेव्हा मी प्रसाद ला सांगितले निवडणूक होणार असेल तर मला बिलकुल अध्यक्ष होण्यात रस नाही, निवडणूक होणार नाही एकमताने तुमची निवड होईल हे प्रसादने अश्वासन दिल्या नंतरच मी माझा होकार कळवला”
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे तर्फे १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांचा सत्कार गुरुवारी यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळेस डॉक्टर जब्बार पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉक्टर पुढे म्हणाले “१०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने अभ्यासपूर्ण नजरेने नाटकाकडे पहावयास हवे, आजचे मराठी नाटक कुठे आहे याचा शोध घ्यायला हवा.”
या वेळेस नाट्यपारिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, मंगेश कदम व मधुरा वेलणकर – साटम उपस्थित होते.
यापुढे नाट्यसंमेलन अध्यक्ष ही निवडणूक नको – डॉक्टर जब्बार पटेल
+1
+1
+1
+1