शिवसेनाभवन येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद.

– एक नवीन पर्व सुरू होत आहे आपण सर्वांनी मिळून त्याचे स्वागत करूया.
– मागील वर्षी २४ नोव्हेंबरला दर्शन घ्यायला अयोध्येत गेलो होतो. २४ तारखेला पुन्हा आयोध्येत जाईन.
– मागे जाताना शिवनेरी किल्ल्यावरील माती मी घेऊन गेलो होतो. या मातीमध्ये काहीतरी जादू आहे.
– सरकार बनेल सरकारची बनवण्याची काळजी नाही.
– आम्ही न्यायदेवतेला वंदन करतो.
– अयोध्या वाद मिटल्याचा आनंद आहे.
– आज शिवसेनाप्रमुखांची आठवण येणं हे स्वाभाविक आहे.
– अनेक वर्षांचा वाद अखेर संपला.
– अडवाणी साहेब यांना भेटण्यासाठी मी जाणार आहे.
– आयोध्या येथे गेल्यावर आपण आपोआप नतमस्तक होतो.
– २४ तारखेला शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तिथे शिवरायांना वंदन करेन.
– या आंदोलनात जे सहभागी झाले होते ते आपल्या सोबत आहेत आणि जे शहीद झाले त्यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो.
– जे पक्ष तोंडी हिंदुत्व बोलतात त्यांनी एकत्र येऊन लढा द्यायला पाहिजे.
– सोनेरी अक्षरांनी लिहावा असा हा दिवस आहे.
– ज्या वेळेला शिवसेनेने हा विषय ऐरणीवर आणला तेव्हा बऱ्याच संघटना शिवसेनेसोबत सहमत होत्या.
– राज्यात शांतता राखण्याचे काम आपण करावं.
– मी सर्व जनतेला शिवसैनिकांना आवाहन करतो की आपण हा दिवस आनंदात शांततेत साजरा करू.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns