फक्त ७५ रुपयात चित्रपट, थोडी कळ काढा!

फक्त ७५ रुपयात चित्रपट, थोडी अधिक कळ काढा!

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने ‘नॅशनल सिनेमा डे’ साजरा करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात फक्त ७५ रुपयात मल्टिप्लेक्स सिनेमागृहात चित्रपट बघण्याची संधी चित्रपट रसिकांना दिली होती मात्र MAI ने काही दिवस पुढे ढकलत आता ही तारीख २३ सप्टेंबर केली असून तसे परिपत्रक काढले आहे व त्याचे कारण दिले आहे विविध भागधारकांच्या विनंतीवरून आणि जास्तीत जास्त चित्रपटगृहांना सहभाग घेण्यासाठी १६ ची तारीख २३ केली असे त्यांनी म्हटले आहे.

मात्र ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट जोरदार चालत असून ७५ रुपये तिकीट ठेवल्यास चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल व यासाठी ‘नॅशनल सिनेमा डे’ ची तारीख एक आठवडा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आल्याने ही तारीख १६ सप्टेंबर ऐवजी २३ सप्टेंबर करण्यात आल्याचे आमच्या सूत्रांकडून समजते.

राष्ट्रीय सिनेमा दिवस ४००० हून अधिक स्क्रीनवर आयोजित केला जाणार आहे. PVR, INOx, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज, सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए2, मूव्ही टाइम, वेव्ह, एम2के, DELITE आणि इतर अनेक मल्टिप्लेक्स यात आपला सहभाग घेणार आहेत.

राष्ट्रीय चित्रपट दिन आयोजित करण्यामागे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये एक दिवसाचा आनंद घेण्यासाठी एकत्र आणणे हा हेतू असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns