शिवसेना भाजपचा एकमेकांवर खोटरडेपणाचा आरोप

 

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत सुद्धा “लाव रे तो व्हिडीओ”

आज ( शुक्रवार ) संध्याकाळी झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ लावून भाजपची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले ” देवेंद्रजींनी शब्दाचा खेळ करत माझ्यावर खोटरडेपणाचा आरोप केला. देवेंद्रजी माझे चांगले मित्र आहेत व त्यांच्या कडून “असे काही ठरलेच नव्हते” या वाक्याने मला अतिशय दुःख झाले. मला खोटे ठरवणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही. तसा काळजीवाहूनीं प्रयत्न करू नये.
तुम्ही सत्ता स्थापनेचा दावा करा, अन्यथा आमच्या समोर पर्याय खुला आहे.
अमित शहा व कंपनीवर आता विश्वास राहिला नाही. युती ठेवायची की तोडायची हे भाजप ठरवणार.
युतीत काडी कोण लावतय याचा शोध मोदींनी घ्यावा.

 

 

 

आजपर्यत विरोधकांनी केले नाहीत इतके घाव शिवसेनेने भाजपावर केले आहेत. – देवेंद्र फडणवीस

१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज (८ नोव्हेंबर) रोजी संपल्याने तांत्रिकदृष्टया मी राज्यपाल महोदयां कडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला असून राज्यपाल महोदयांनी तो स्वीकारला असून पुढील काही दिवस मला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावयास सांगितले आहे मात्र या काळात मुख्यमंत्री म्हणून मी कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत हे सांगितले, ते पुढे म्हणाले,
” मी उद्धव ठाकरेंना फोन करत होतो पण त्यांनी माझा एकही फोन घेतला नाही, उद्धवजींच्या आजूबाजूला जी लोक आहेत ते दरी वाढवण्याचे काम करत आहेत, कोणी असे समजू नये आम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही उलट त्यांच्या पेक्षा जबरदस्त शब्दात अमी त्यांना उत्तर देऊ शकतो. पण आमचा तो पिंड नाही आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही. मोदीजी वर शिवसेनेने केलेली टीका ही विखारी होती. त्यामुळे जर मोदींजींच्या विरुद्ध असेच विखारी व्यक्तव्य होत राहिल्यास तर मग अश्यां बरोबर का राहायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे वाटते.
आजपर्यत विरोधकांनी केले नाहीत इतके घाव शिवसेनेने भाजपावर केले आहेत.
पुढचे सरकार भाजपचं स्थापन करेल पण कोणतेही फोडाफोडीचे राजकारण न करता, हा मी तुम्हाला शब्द देतो.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns