सचिन चिटणीस………..
शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कथांवर एकून पांच चित्रपट करायचे हे अगोदरच ठरले होते त्यापैकी पहिला फर्जंद झाला आता दुसरा फत्तेशिकस्त, फर्जंद केल्या नंतर आम्ही काही धाडशी निर्णय घेण्याचे ठरवले व त्यात महत्वाचा निर्णय म्हणजे, लाईव्ह लोकेशनला चित्रपट शूट करणे. फर्जंद बनवताना ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या फत्तेशिकस्त आम्ही नक्कीच दूर करायचा प्रयत्न केला आहे. फत्तेशिकस्त मध्ये आम्ही एक कव्वाली केली आहे, त्यात आम्ही सोळा झुंबरे लावली होती आणि त्याचे भाडे तब्बल सहा लाख रुपये होते. या चित्रपटात एकूण चौदा गाणी आहेत पण प्रत्येक गाणे हे वेगळ्या घाटणीचे आहे.
हे मी जे पांच चित्रपट करत आहे ते पूर्णपणे शिवकालीन असल्याने यात संभाजी महाराज तीत्केशे दिसणार नाहीत ते बालवयात मात्र दिसतील.
चित्रपटाचा कॅनवास मोठा असल्याने आव्हानेही तेवढीच वाढली. राजगडावर राहण्यासाठी काहीही सोय नाही. एवढेच काय पायऱ्याही नीट नाहीत, समुद्रसपाटी पासून साडेतीन हजार उंचीवर शुटिंग करायचे होते, आणि तेव्हा तापमान होते 40℃, माझ्या चित्रपटात नावाजलेले तसेच जेष्ठ कलाकारही आहेत. मग त्यांची राहण्याची, बसण्याची सोय कशी करावी कारण व्हॅनिटी वर जाऊ शकत नाही, माझा प्रॉब्लेम मी मृणालताईंकडे बोलून दाखवला त्या लगेच म्हणाल्या “काही प्रश्न नाही आपण करू की” राजगडावर असलेल्या पद्मवतीच्या व रामेश्वर मंदिरात ही सगळी मंडळी राहिली.
मी कलाकार नावाजलेले आहेत म्हणून त्यांना माझा चित्रपटात घेतले नाही तर त्यांच्या अभिनयाचा अनुभव, वकुब व प्रेक्षकांना पसंद पडतील असेच कलाकार निवडले.
जे मला करणे शक्य आहे तेच लिहिले आणि शूट केले पण काही अशक्यही गोष्टी लिहिल्या व त्या शूट करून बघितल्या कारण माझ्या ५ चित्रपटाच्या माळेतील हा दुसरा चित्रपट आहे, अजून तीन चित्रपट यायचे आहेत आणि प्रत्येक चित्रपटागणिक प्रेक्षकांच्या माझ्या कडून अपेक्षा वाढतच जाणार आहेत याची मला कल्पना आहे आणि म्हणूनच अशक्यही गोष्टी करून बघितल्या जेणे करून पुढील चित्रपटासाठी मला त्याचा उपयोग होईल.
चित्रपट म्हणून राजगडावर चित्रित झालेला हा पहिला चित्रपट होय हा चित्रपट आम्ही १५०० शोजनी ओपन करत आहोत.