दशावताराची कथा आणि व्यथा! ‘पिकासो’तून दिसणार प्रसाद ओक.

‘बुटीक फिल्म स्टुडिओ’ आणि ‘प्लॅटून वन फिल्म्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱ्या ‘पिकासो’ या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओक यांच्या दशावतारातील मोहक छबीचा फर्स्ट लुक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली असून चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. अमराठी युवा निर्माते शिलादित्य बोरा यांची ही पहिली निर्मिती असून या चित्रपटाचे कथा व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचं असून 6त्यांचा हा पहिलाच चित्रपट जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘१० व्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ व ‘७व्या ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल’ करिता निवडला गेला आहे. २८ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जागरण फिल्म फेस्टिव्हल’ तर २९ सप्टेंबर रोजी ‘ब्रम्हपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल’, गुवाहाटी येथे या चित्रपटाचे विशेष खेळ होणार आहेत.

तळ कोकणातील वालावल येथील लक्ष्मी – नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास व त्याविषयीचे दस्तऐवज उपलब्ध असून या लोककलेवर बेतलेला ‘पिकासो’ हा एकमेव चित्रपट आहे. योगायोग म्हणजे त्याचे चित्रीकरणही याच मंदिरात करण्यात आले आहे. या लोककलेला ८०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असून राजाश्रय व सरकारी अनुदानाशिवाय ही लोककला जिवंत ठेवण्याचे कसब दशावतारी कलावंतांनी जोपासले असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तीन लाख पन्नास हजार दशावतारी कलावंतांची उपजीविका या कलेवर असूनही सरकारने या कलावंतांच्या तसेच या लोककलेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. “आजतागायत या दशावतारी कलेसाठी प्रचंड आर्थिक संघर्ष करून, आपले कर्तव्य समजून तिला जिवंत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या अगणित दशावतारी हयात व दिवंगत कलावंत, गायक यांना हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत” असे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग सांगतात.

या चित्रपटात बाल कलाकार समय संजीव तांबे याची प्रमुख भूमिका असून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा तारा, लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक यांनी दशावतारी रंजल्यागांजलेल्या व्यसनाधीन पित्याची विलक्षण भूमिका साकारली आहे.

निर्माते शिलादित्य बोरा सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टी आज एक अत्यंत विकसित आणि अष्टपैलू कलेने समृद्ध आहे. अलिकडच्याकाळात कित्येक अत्याधुनिक, तांत्रिक सकस दर्जेदार सिनेमाची निर्मिती झाली आहे, जगभरातील समीक्षकांची प्रशंसा आणि बॉक्स ऑफिसवरील नोंदी पाहता हा मराठीचा सुवर्ण काळ आहे”

वर्ष अखेरीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचे निर्माते शैलादित्य बोरा यांनी सांगितले.
चित्रपटाच्या अद्यावत माहिती व छायाचित्रांसाठी खालील सोशल प्लॅटफॉर्मवर भेट द्यावी.
www.facebook.com/PlatoonOneFilms
www.twitter.com/PlatoonOneFilms
www.instagram.com/PlatoonOneFilms

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns