अनादी निर्गुण: देवीच्या विविध रूपांची अनुभूती देणाऱ्या चित्रपटांची मेजवानी!

अनादी निर्गुण: देवीच्या विविध रूपांची अनुभूती देणाऱ्या चित्रपटांची मेजवानी!
प्रेक्षकांना अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत देवीच्या विविधरूपांचे अनुभूती देणारे चित्रपट आठवडाभर पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘फक्त मराठी’ वाहिनीवर २९ सप्टेंबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत रोज सकाळी ८.३० वाजता हे चित्रपट ‘अनादी निर्गुण’ सिनेमहोत्सवाअंतर्गत पाहता येणार आहेत.
‘अनादी निर्गुण’ सिनेमहोत्सवामध्ये आई तुळजा भवानी (२९ सप्टेंबर), काळूबाई पावली नवसाला (३० सप्टेंबर), जय मोहता देवी (१ ऑक्टोबर), माय माऊली मनुदेवी (२ ऑक्टोबर), महिमा अन्नपूर्णा देवीचा (३ ऑक्टोबर), आई एकवीरेचा उदो उदो (४ ऑक्टोबर), जोगवा अंबाबाईचा (५ ऑक्टोबर), कुलस्वामिनी तुळजाभवानी (६ ऑक्टोबर) आणि माँ शाकंभरीचा महिमा (७ ऑक्टोबर) या चित्रपटांचा समावेश असणार आहे.
‘अभिमान भाषेचा…वारसा कलेचा’ असे ‘फक्त मराठी’चे ब्रीदवाक्य आहे. या वाहिनीने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान घट्ट केले आहे. ही वाहिनी आता कात टाकत असून मालिकांच्या नवनिर्मितीकडे वळाली आहे. अलीकडेच फक्त मराठीवर ‘सिंधू’ आणि ‘धूमधडाका’ हे दोन नवे शोज लाँच करण्यात आले. वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात, ‘नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी आम्ही अनादी निर्गुणनिमित्त प्रेक्षकांसाठी सकाळच्या वेळेत देवीच्या लोकप्रिय चित्रपटांचे दालन घेऊन आलो आहोत. येत्या काळात सिनेमा आणि मालिकांसंबंधी आणखीनही काही नवीन प्रयोग वाहिनीवर बघायला मिळतील.’

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns