जेष्ठ सरोद वादक पदमविभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे ‘मास्टर ऑन मास्टर्स’ हे पुस्तक पैंग्विन रँडम हाऊस यांनी मराठी मध्ये प्रकाशित केले आहे. २०१७ साली हे पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले होते. ह्या पुस्तकाची पहिली मराठी प्रत अमजद अली खान यांनी माननीय केंद्रीय सूचना-प्रसारण, वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्राची जावडेकर यांना भेट म्हणून दिली.
‘मास्टर ऑन मास्टर्स’ हे पुस्तक बडे गुलाम अली खाँ, आमीर खाँ, बेगम अख्तर, अल्ला रखाँ, केसरबाई केरकर, कुमार गंधर्व, एम. एस. सुब्बुलक्ष्मी, भीमसेन जोशी, बिस्मिल्ला खाँ, रवी शंकर, विलायत खाँ आणि किशन महाराज ह्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या विसाव्या शतकातील बारा दिग्गज संगीत कलावंताच्या जीवनाबद्दल, वैयक्तिक शैलींबद्दलचा तपशील आणि त्यांच्या काळाविषयी एक गहन रहस्य व्यक्त करते. ह्यातील व्यक्तिचित्रं जितक्या आपुलकीनं आणि प्रेमादरानं रेखाटलेली आहेत, तितकीच त्यामध्ये मिश्कील छटाही ही वाचकांना वाचायला मिळतील.
वाचक ह्या पुस्तकाची इलेक्ट्रॉनिक प्रत ऍमेझॉन ह्या वेबसाईट वरून खरेदी करू शकतात आणि ह्या सुवर्ण काळाला आणि दिग्गजांच्या शैलीला अनुभवू शकतात.
पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://www.amazon.in/Master-Masters-Marathi-Ustad-Amjad/dp/0143441523