सूर चैतन्य कला केंद्र आणि चेंबूर येथील भावना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २१ आणि २२ सप्टेंबर रोजी वादन, नृत्य आणि गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबूर येथील भावना महाविद्यालयात ही स्पर्धा होणार असून इच्छुकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सर्व वयोगटातील महिला – पुरूषांसाठी खुली आहे. शास्त्रीय गायन तसेच नृत्य यासाठी साथ-संगत आवश्यक आहे. सर्व वयोगटातील स्पर्धकांना शास्त्रीय कलेसाठी १ ते १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. ही वेळ स्पर्धेच्या दोन तास आधी दिली जाईल. सुगम संगीतात गझल, भजन यापैकी काहीही चालेल. त्याला भाषेचे कसलेही बंधन नाही. पहिल्या फेरीत चित्रपट संगीताचे केवळ एक कडवे गायचे आहे. तर दुसऱ्या फेरीत संपूर्ण गाणे गायचे आहे.
ही स्पर्धा वेगवेगळ्या गटांमध्ये होणार असून शास्त्रीय गायन, नृत्यसाठी ६ ते १० वर्षे , ११ ते १५ वर्षे, १६ ते २१ वर्षे आणि २२ आणि वरील असे चार गट आहेत. सुगम, चित्रपट संगीत स्पर्धेसाठी ६ ते १२ वर्षे, १३ ते २० वर्षे, २१ ते ४५ वर्षे आणि ४६ वरील असे चार गट असणार आहेत.
पारितोषिक वितरण अंतरराष्ट्रिय ख्यातिप्राप्त कलाकार सतारवादक प.पुष्पराज कौष्टी ह्यांच्या हस्ते करण्यात येईल
अधिक माहितीसाठी 9977464314 या क्रमांकावर संपर्क साधावा.
मुंबईत होणार गायन, वादन आणि नृत्य स्पर्धा
+1
+1
+1
+1