नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवातील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी 

नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवातील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी

नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवातील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अनुक्रमे दिनांक ३ जून २०२४ आणि ५ जून २०२४ रोजी संपन्न होणार…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली. त्यातून निवडलेल्या स्पर्धक / संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधीत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर येथे एकांकिका (२६ संस्था), बालनाट्य (२६ संस्था) व एकपात्री (६३ स्पर्धक) येथे पार पडली.

सदर स्पर्धेतीलअंतिम फेरीत निवड झालेल्या ९ एकांकिकेंना मार्गदर्शन करण्यासाठी  नीरज  शिरवईकर – बुलढाणा,  मंगेश कदम-पुणे,. संतोष पवार-पुणे, . राजेश देशपांडे-कोल्हापूर,. विजय केंकरे-बीड,. कुमार सोहोनी-नाशिक, . अद्वैत दादरकर-अहमदनगर, . चंद्रकांत कुळकर्णी-मुंबई,. विजू माने – विरार यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन मार्गदर्शन केले आहे आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या ९ एकांकिकांना नामांकित ज्येष्ठ व श्रेष्ठ दिग्दर्शक मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच ही अंतिम फेरी उत्कंठवर्धक होणार आहे.

दिनांक ३ जून २०२४ रोजी बालनाट्य (९) आणि दिनांक ५ जून २०२४ रोजी एकांकिका (९) स्पर्धेची अंतिम फेरी अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयच्या मागे, भायखळा, मुंबई येथे सकाळी ९.०० वाजल्यापासून संपन्न होणार आहे.

अंतिम फेरीसाठी निवडलेली बाल नाटके

(अक्र बालनाट्याचे नाव संस्था शहर)

१ जीर्णोद्धार – नाट्यसंस्कार कला अकादमी – पुणे

२ दगड – अलंकार कला अकॅडेमी – कोल्हापूर

३ मिशन फ्युचर क्रॉप – संदेश विद्यालय, विक्रोळी – मुंबई

४ काय ते जाणावे – डी. ए.व्ही. पब्लिक स्कुल, पनवेल – पनवेल

५ विंडोज ९८ – मोहिनी देवी रुंगटा प्राथमिक विद्यालय नाशिक

६ फुलपाखरु – नाट्य आराधना – अहमदनगर

७ म्हावरा गावलाय गो – नाट्यरंगग – जळगाव

८ खिडकी – बामणी शिक्षण प्रसार मंडळ – नागपूर

९ देवाला पत्र – विश्वास प्रतिष्ठान, खडकी – अकोला

 

*अंतिम फेरीसाठी निवडलेली एकांकिका*

(अक्र एकांकिकेचे नाव संस्था शहर)

१ अनपेक्षित – माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन – बुलढाणा

२ वाटसरु – ड्रास्टिक क्रिएशन – पुणे

३ सिनेमा – मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स – पुणे

४ निर्झर – महावीर विद्यालय – कोल्हापूर

५ नवस – प्रगती सेवाभावी संस्था – बीड

६ अ डील – अ.भा.म.ना. परिषद शाखा – नाशिक

७ उर्मिलायण – केक फाउंडेशन – अहमदनगर

८ व्हॉटस्अप – एकलव्य प्रोडक्शन – मुंबई

९ नारायणास्त्र – नटवर्य रंगमंच – विरार

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns