नेहरू सेंटर मध्ये ‘दुर्गा सप्तशती’ चित्रांचे प्रदर्शन उदयराज गडनीस यांचे १८० दिवसात १८० चित्रांची निर्मिती.

नेहरू सेंटर मध्ये ‘दुर्गा सप्तशती’ चित्रांचे प्रदर्शन उदयराज गडनीस यांचे १८० दिवसात १८० चित्रांची निर्मिती.

नेहरू सेंटरमध्ये ‘दुर्गासप्तशती’ उदयराज गडनीस यांच्या चित्रांचे प्रदर्शन दि. २१ ते २६ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान भव्य प्रदर्शन. १८० दिवसात १८० चित्रांची निर्मिती

लंडन स्थित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार, आध्यात्मिक गुरु उदयराज गडनीस यांच्या “दुर्गासप्तशती” या चित्रकलाकृतींचे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर कलादालनात सुरू झाले असून हे प्रदर्शन दि. २१ ते २६ फेब्रुवारी, २०२४ हया दरम्यान ११ ते ७ यावेळेत विनामूल्य पाहता येणार आहे. सदर प्रदर्शनात त्यांनी श्री दुर्गा मातेच्या श्लोकांचे तत्वज्ञान, त्यातील आध्यात्मिक शक्ती व भक्ती विविध चित्रांद्वारे साकारली आहे.

उदयराज गडनीस हे गेली १५ वर्षापासून लंडनमध्ये स्थायिक आहेत. आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांचा लंडन आणि भारतात खूप मोठा चाहता वर्ग आहे. गेली ३५ वर्ष ते कलाक्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत ३००० च्यावर विविध आध्यात्मिक विषयावर चित्रे साकारली आहेत. त्यांची देश – विदेशात अनेक प्रदर्शने भरली असून त्यांना कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २०१७ मध्ये त्यांनी मुंबईत नेहरू सेंटर मध्ये सूर्य मालिकेवर आधारित चित्र प्रदर्शन भरविले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२० मध्ये जेंव्हा कोरोना व्हायरसने जग उध्वस्त केले होते. तेव्हा मुंबईत त्यांनी आई वडिलांची सेवा करताना संपूर्ण दुर्गासप्तशतीचे ध्यान केले. त्या ग्रंथावर प्रेरित होऊन उदयराज गडनीस यांनी त्यावर आधारित १८० चित्रांची ही चित्रमालिका तयार केली. विशेष म्हणजे त्यांनी ही चित्रे १८० दिवसात रेखाटली असून ही सर्व चित्रे एकाच गॅलरीत प्रदर्शित होत आहेत.

दुर्गासप्तशती हा असा स्त्रोत ज्याचा प्रत्येक मंत्र प्रभावी परिणाम देणारा आहे. दुर्गासप्तशती हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये महिषासुर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे. यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्र आहे. दुर्गासप्तशतीचे १३ अध्याय आहेत. त्यात एकूण ७०० श्लोक आहेत. त्या श्लोकांवर आधारित त्यांनी ही चित्रमालिका साकारली आहे.

चित्रकार उदयराज गडनीस यांनी सादर केलेल्या हया चित्रमालिकेत दुर्गा देवीच्या विविध रूपाचे दर्शन होते. त्या विविधतेत अनेक आध्यत्मिक शक्तिस्थानांचे दर्शन घेण्याचा मोह कुणालाही आवरणार नाही, इतकी ती चित्रे गुंतवून ठेवणारी आहेत. अनेक बलस्थाने असणाऱ्या या कलाकृती रसिकांना एकाग्र करणाऱ्या आहेत. प्रत्येक चित्र हे रसिकांना वेगवेगळा अनुभव देणारे आहे. प्रत्येक चित्राचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यातला आध्यात्म नेमकेपणाने गवसतो आणि तो क्षण आध्यात्मिक शक्तीची अनुभूती देणारा ठरतो. त्यांनी हे कला प्रदर्शन दिवंगत श्रीमती लतिका गायतोंडे यांना समर्पित केले आहे.

+1
6.4k
+1
2.1k
+1
0
+1
0
IPRoyal Pawns