विहीर
संहितेच्या शब्दांत
लपलेले आकृतिबंध
जेव्हा प्रत्यक्ष, सरूप
साकारू लागतात
….
….
पात्राचं नांव आणि पुढे संवाद
अशा संहितेतल्या
ढोबळ सपाट रचनेला
मिती प्राप्त होत जातात
आवाजांची, उद्गारांची
हालचाली अन् भावभावनांची
जोड लाभत
उलगडत जातं एक चित्र
त्रिमित चित्र
जिथे शब्दाशब्दांदरम्यानच्या
कोऱ्या जागांमधले अर्थांचे झरे
पसवू लागतात
नाटकाच्या अनुभवाची विहीर
ओतप्रोत भरून टाकण्यासाठी !!
– प्रदीप वैद्य
( माझ्या “नारकोंडम” या मराठी दीर्घांकाच्या तालमीतील एक क्षण ! या दीर्घांकाचे पाच प्रारंभिक प्रयोग दिनांक 23 आणि 24 जुलै 2022 रोजी The Box : द बॉक्स येथे आम्ही सादर करणार आहोत. )
( अधिक माहितीसाठी 9309985767 वर INFO असा मेसेज पाठवा)
+1
+1
+1
+1