“मला पांडुरंग असा भेटला” : स्वप्नील जोशी

“मला पांडुरंग असा भेटला” : स्वप्नील जोशी

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र आषाढी ए्कादशीचा माहोल आहे. माऊली माऊलीच्या गजरात प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होत विठुरायाच्या भेटीत रंगून गेले आहेत. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यानेही वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आपली अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती पूर्ण केली.

वारीचा हा प्रवास” प्रत्येकाने एकदा तरी करावाच..”तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !” असे माझी आजी म्हणायची. ती असे का म्हणायची त्याची अनुभूती मला काल झाली. काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही अशा शब्दात स्वप्नीलने आपला अनुभव कथन केला. स्वप्नील म्हणाला की, आम्ही पिक्चरमधील हिरो असलो तरी खरे हिरो हे वारकरीच. वर्षनुवर्ष तहान भूक विसरून, पायी वारी चालतात. पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते. त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटले.

या वारीमध्ये १ओटीटीच्या टीमने जे काम केले आहे, करत आहेत, मग ते अन्नदान असेल, बसायची,पाण्याची सोय असेल, पत्राशेड असेल, लॉस्ट अँड फाऊंड स्टॉल असतील. ते पाहून खूप आनंद झाला. मनोरंजन करता करता समाज सेवा करता येत आहे याचा एक वेगळा अनुभव मिळाला आणि आनंद वाटला असेही स्वप्नीलने सांगितले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns