किरण मानें पाई, प्रोडक्शन हाऊस कात्रीत!

राजकीय भूमिका घेतल्याने अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आले होते. या घटनेचे पडसाद आता सोशल मीडिया, मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत.

स्टार प्रवाहने किरण मानेंच्या बाबतीत दिलेल्या निवेदनात “मुलगी झाली हो’ या शोमध्ये विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते श्री. किरण माने यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत, हे आम्हाला समजले आहे. असे आरोप होणे दुर्दैवी आहे. प्रॉडक्शन हाऊसने पुष्टी केली आहे की श्री. माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय शोमधील अनेक सहकलाकारांसोबत, विशेषत: शोच्या महिला अभिनेत्रीं सोबत केलेल्या गैरवर्तणुकीमुळे झाला होता. अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यांचे सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांना त्यांनी सतत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वागणूक दिली. श्री. माने यांना अनेक इशारे देऊनही त्यांनी सेटवर मूलभूत शालीनता आणि शिष्टाचाराचे उल्लंघन करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. शो कोणत्याही प्रकारचे अनादरपूर्ण वर्तन सहन करणार नाही, ते आमचे धोरण नाही. आम्ही सर्वांच्या मतांचा आदर करतो आणि स्वतःला लोकशाही स्वातंत्र्याचे रक्षक समजतो. तथापि, आम्ही आमच्या कलाकारांसाठी, विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तितकेच वचनबद्ध आहोत.”

किरण मानेंची फेसबुक वरील पोस्ट…….
आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..
आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.., जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी हायेत. प्रॉडक्शन हाऊस विरोधात
बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात
बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच!
पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा !
मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !
तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!!
– किरण माने.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns