‘‘आज ९१ दिवसांनंतर इतकी माणसे बघत आहे खूप बरे वाटत आहे.’’
बिग बॉस मराठी सिझन ३ च्या सदस्यांच्या चेहऱ्यावर हेच दिसत होते. कारणही तसेच होते बिग बॉस मराठीच्या घरात आज पर्यंत कधी न घडलेले घडत होते चक्क बिग बॉसच्या घरात काही निवडक पत्रकारां बरोबर बिग बॉसच्या घरातील उरलेल्या सहा जणां सोबत पत्रकार परिषद होत होती. दिवस… रविवार १९ डिसेंबर..
मीरा जगन्नाथ, मीनल शाह, विकास पाटील, डॉ.उत्कर्ष शिंदे, जय दुधणे आणि विशाल निकम यांचा समावेश होता. यातील विशाल निकम हा अगोदरच टिकिट टू फिनाले मिळाल्यानं सेफ झाला होता. बिग बॉसने सदस्यांना पत्रकार आल्याची वर्दी दिल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे टेन्शन आले होते. जय, उत्कर्षला बोलला देखील खरे पत्रकार असतील कारे? ते काहीही प्रश्न विचारतात न? तुला काय सवय असेल! उत्कर्षाने जयला धीर दिला, जो मन मे ही वो बोलनेका आता हेच आपले तारणहार आहेत. हीच लोक आपले म्हणणे सगळ्यान पर्यंत पोहचवणार आहेत आणि त्यावरच आपली मते ठरणार आहेत.
हळूहळू पत्रकारांच्या व सदस्यांच्या मध्ये असलेला पडदा उघडला गेला. दोन्ही बाजून कडून एकमेकांना हाय- हॅल्लो झाले. आणि सुरु झाला प्रश्नोत्तरांचा तास सुरवातीला पत्रकारांच्या प्रश्नांना अद्खाल्णारे सदस्य नंतर मात्र मोकळेपणाने उत्तरे देवू लागले.
मी सोनालीला असे बोलावयास नको होते ही खंत विशाल निकम ने बोलून दाखवली तर माझ्या जीवनात खरोखरच सौंदर्या आहे व आमचे हे प्रकरण दोन्ही बाजूच्यांना माहित आहे व लवकरच आम्ही लग्न करू व तुम्हा सर्व पत्रकारांना त्याचे आमंत्रण पाठवू अशी गाव्ही विशालने दिली मात्र तिचे सौंदर्या हे खरे नाव नसून ते वेगळे आहे हे ही तो सांगायला विसरला नाही.
आम्ही खरोखरीच शेतकरी असून आमची ८ एकर द्राक्षाची बाग आहे मात्र बेंगलोरला आमच्या व्यवसायही आहे. तो वडील बघतात असेही त्याने नमूद केले. त्याच प्रमाणे तिकीट टू फिनाले बद्दल त्याने मोकळेपणाने आपल्या बि टीम मधील सदस्यांमुळेच हे शक्य झाल्याचे सांगावयास विसरला नाही.
तर विकास पाटील म्हणाला, आता या वळणावर कोणाच्याही बाबतीत माझ्या मनात किंतु परंतु नाही. किवा कोणाला घराबाहेर काढण्यासाठी कोणतीही आखणी केलेली नाही आता सर्व काही आहे ते मायबाप प्रेक्षकांवर आहे.
तर मीनल शहा म्हणाली – मला फेक वागता येत नाही व समोर कॅमेरा आहे म्हणून मी त्या प्रमाणे वागत नाही. बिग बॉसच्या या घरात सर्व सदस्यांनी टास्क मध्ये, रिलेशनशिप मध्ये व इतर सर्व गोष्टींमध्ये सर्वानीच खूप मेहनत घेतल्याने सर्वजण या घरात राहण्यास पात्र ठरले आहेत. सोनाली बरोबर माझे अगदी पहिल्या दिवसापासून खूप चांगले बॉंडिंग जमले होते. पण काही कारणास्तव शेवटी शेवटी भांडण झाले पण मला आनंद आहे ते भांडण फार वेळ टिकले नाही ते त्याच प्रमाणे काही गैरसमजुतीं मुले विकास बरोबरही थोडे वादविवाद झाले मात्र आता सगळे मिटले आहे.
स्नेहा सोबत तुझे खरेच मैत्रीचे सबंध होते का अजून काही या प्रश्नावर जय दुधाणे थोडा भावूक झाल्याचे जाणवले व त्याने कबुली दिली ‘मैत्री पेक्षा थोडे जास्त’.तसेच जेव्हा त्याला विचारण्यात आले कि दुसर्यांचा गेम करता करता टू स्वताचा गेम विसरल्या सारखे वाटत नाही का? तेव्हा जय म्हणाला – मी माझा गेम विसरलो असं कुठेही वाटत नाही. कारण आतापर्यंत अशी कोणतीही सिच्युएशन आली नाही. एक आठवडा होता, जो स्नेहा पुन्हा या घरात आली होती तेव्हा मी थोडा कमी झालो होतो पण त्याला एकटी स्नेहा जबाबदार नव्हती मला दुखापत झाली होती आणि माझी तब्बेतही जरा नरम गरम होती. त्यामुळं मी गेमप्लॅन विसरलोय असं वाटत नाही. माझे स्नेहा बरोबर एक नात जुळले होते पण त्यात काही चुकीचं इंटेंशन नव्हतं. घरात माझे बऱ्याच लोकांसोबत खटके उडाले असून, भांडणही झालं आहे, पण मला त्याचा काही फरक पडत नाही. अर्थातच हा वैयक्तीक गेम असून, इथं एकच व्यक्ती जिंकणार आहे. त्यामुळं माझ्याही काही स्ट्रॅटेजीज होत्या. ते मी अॅक्सेप्टही करतो. काही गोष्टी आपण करतो त्या अॅक्सेक्ट करणंही खूप महत्त्वाचं असतं.
मी माझ्या स्वतःसाठी खेळत होतो. दुसऱ्यांसाठी कधी खेळतच नव्हतो हे मी मान्य करतो. बऱ्याच टास्कमध्ये टीमसाठी खेळत असताना कुठेतरी अनफेअर होतोय असं मला फील झालं. जवळपास बऱ्याच टास्कमध्ये ही गोष्ट जाणवली. मी जेव्हा कॅप्टन होतो, तेव्हाही त्याची जाणीव झाली. त्यामुळंच माझा गेम सुधारत गेला.
मीरा जगन्नाथ म्हणाली, मी आहे ही अशी आहे काही वेळेस मला बिग बॉस चे पटले नाही व त्याबद्दल मला कसलाही खेद नाही. अगदी पहिल्या दिवसापासून माझी व गायत्रीची छान जोडी जमली होती पण काही कारणास्तव त्यात फूट पडली मी ती चूक सुधारायचा प्रयत्न केला मात्र समोरून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, मी तरी किती प्रयत्न करणार पण आता इथून बाहेर पडल्या नंतर मी तिच्या घरी जाणार आहे.
डॉ. उत्कर्ष शिंदे यांना तुम्हाला मीराने डबल ढोलकी ठरवले आहे त्याबद्दल काय म्हणाल असे विचारल्यावर उत्कर्ष म्हणाला ‘ डबल ढोलकी म्हणजे दोन्ही कडून वाजते टी मात्र मी नेहमी दोन्ही कडच्या बाजू सावरून धरायचा प्रयत्न केला एका अर्थी मी मध्यस्थाची भूमिका निभावली त्याला डबल ढोलकी म्हणत असतील तर….त्यानंतर घरी आलेल्या पत्रकारांचं स्वागत आणि कार्याचा गौरव उत्कर्षनं आपल्या गाण्याद्वारे केला. ‘शेतकऱ्यांचे, मोलकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे तुम्ही आवाज झाला साऱ्यांचे, तुम्ही आधारस्तंभ चौथे भारताचे…’ यावर पत्रकारां कडून त्याला जोरदार प्रतीसाद मिळाला.