कोरोनाच्या दीड ते दोन वर्षाच्या काळात सर्व जण घरीच बसून होते या काळात चित्रपट, नाटक, नवीन सिरीयल येत नव्हत्या त्यामुळेच की काय लोकांनी इंटरनेट वरती जुन्या सिरीयल किंवा जुनी नाटके किंवा जुने चित्रपट बघितले व ते जास्ती करून मनोरंजनावरती भर देणारे किंवा मनाला आनंद देणारे असे चित्रपट किंवा नाटके होती. त्यातून लोकांचा उद्देश एवढाच होता ही मनावर आलेले कोरोनाचे दडपण दूर व्हावे याच गोष्टीचा विचार करून चित्रपट, सिरियल्स किंवा नाटकातील निर्मात्यांनी हा धागा पकडून ‘पांडू’ हा दादा कोंडके यांना किंवा दादा कोंडके यांच्या आठवणीला उजाळा देणारा असा चित्रपट आणला व त्याची टॅगलाईन होती “दादा परत या ना…हसवा ना’ तसेच आता निर्माते राहुल भंडारे एक नाटक घेऊन येत आहेत जे मालवणी सम्राट बाबूजी म्हणजेच मच्छिंद्र कांबळी यांची आठवण ताजी करून देत आहे असे लक्षात येत आहे. त्याचे नाव आहे ‘वन्स मोअर तात्या’
पांडू मध्ये भाऊ कदम मुख्य भूमिकेत म्हणजे दादांच्या भूमिकेत आहे तर ‘वन्स मोअर तात्या’ मध्ये तात्यांच्या इरसाल भूमिकेत मिलिंद पेडणेकर आहेत. प्रेक्षकांना ‘पांडू’ हा चित्रपट आवडला आहे आता प्रतीक्षा आहे ‘वन्स मोअर तात्या’ या मालवणी नाटकाची प्रेक्षक त्याला कसा रिस्पॉन्स देतात ते पहायचे.