*अपूर्वा च्या यशाची दशकपूर्ती* ?..
वाचा तिच्याच लेखणीतून…….
मुंबई ते गोवा ही किनारपट्टी म्हणजे निसर्गाचे एक अवखळ रूप या रूपात दडलेले कितीतरी चाकरमाने या मुंबापुरीत स्थिरावले. यातीलचं एका चाकरमान्यांच्या पोटी जन्मलेली मी तुमची लाडकी *शेवंता उर्फ अपूर्वा सुभाष नेमळेकर* मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून बी.एम.एस ची पदवी संपादन करून पुढील उच्च शिक्षणासाठी मला परदेशी जायचं होतं परंतु अंगातल्या कलागुणांनी मला शांत बसू दिलं नाही २०११ साली झी मराठी वरील ” आभास हा ” या टीव्ही सिरीयल च्या ऑडिशन साठी मला फोन आला आणि बाबांना घेऊन मी त्या ऑडिशनला गेले तोपर्यंत ऑडिशन हा शब्द पण मला माहिती नव्हता माझ्यातील कलाकार पाहून आभास हा या मालिकेतून मी या चंदेरी दुनियेत प्रवेश केला. त्यानंतर एकापेक्षा एक हा डान्स शोमध्ये भाग घेतला. भाखरखाडी, ७किमी, इश्क वाला लव्ह, व्हीला, द ऍक्सीडेन्टल प्रायमिनिस्टर, सब कुशल मंगल
यासारख्या हिंदी वं मराठी फिल्म करण्याची संधी मिळाली.. आराधना, तू जीवाला गुंतवावे, प्रेम हे, तू माझा सांगती … या टीव्ही मालिकांमधून मी घराघरात पोहचले. हे पाहून जगन्नाथ गंगाराम पेडणेकर सारख्या सुप्रसिद्ध ज्वेलरीची ब्रँड अँबेसिडर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली.
बर्याचदा असं झाले की हीरोइन म्हणून मुख्य रोलसाठी माझी निवड झाली आणि अंतिम क्षणी मला बदलण्यात आलं.. तेव्हा खुप डिप्रेशन पण आलं. आणि असंही झालं की मुख्य हिरोईन म्हणून रोल केलेल्या फिल्म शूटिंग पूर्ण होऊनसुद्धा दुर्देवाने काही ना काही कारणानं रिलीज झाल्या नाहीत..कधी वजन वाढवा, तर कधी वजन कमी करा.. त्यामुळे जीवनात यश- अपयशाच्या पायऱ्या खालीवर होणे चालूच होतं. म्हणून धीर सोडला नाही आणी खचूनही गेले नाही. यशाची वाट पाहत प्रयत्न चालूच ठेवले. खरंतर आम्हा कलाकार मंडळींना कलाकारातील कला जिवंत दाखवण्यासाठी प्रथम नाट्य रंगमंचावर वावरावं लागतं नाटक हृदयात जपावं लागतं तिथेच खऱ्या जिवंत कलेचा कस लागतो म्हणून मी ” ‘आलाय मोठा शहाणा’ या आयुष्यातील पहिल्यां नाटकातून रंगमंचावर पाऊल ठेवल. आणि याच नाटकासाठी मला नाट्य परिषदेचा ‘बेस्ट एक्ट्रेस इन कॉमिक रोल’ हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर चोरीचा मामला आणि आता इब्लिस हे नाटक मी करत आहे. कोरोना मुळे त्याचे प्रयोग थांबलेले आहेत पाहूयात लवकरच सुरू होतील.
मध्ये बराच काळ हातात काहीच काम नव्हते. आयुष्यात अनेक चढ-उतार आले मधेच माझा आधारवड असलेले माझे बाबा सोडून गेले. अगदी आभाळ फाटल्या सारखं झालं. अनेक संकटांना तोंड देत क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया यासारखे एपिसोडीक शो सुरू ठेवले. पॉलिटिक्स सारखी वेब सिरीज केली चढा नंतर उतार असतोच या निसर्ग नियमाने मी कार्यरत राहिले.. बे बेभरवशाच्या बेगडी दुनियेत स्त्रीमनाची ससेहोलपट मी अनुभवली. पण खचून गेले नाही परिस्थितीशी दोन हात करत तटस्थ उभी राहिले अगदी सह्याद्रीच्या पहाडासारखी…….
कलागुणांनी ठासून भरलेल्या सौंदर्याला शिक्षण, आणि आई-वडिलांच्या संस्काराची जोड मिळाली तर आभाळ ठेंगणं व्हायला वेळ लागत नाही, अगदी नेमकं तसंच माझ्या बाबतीत घडलं आणि ज्या मालिकेने मला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं ती झी मराठी ची मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ त्यातील माझी भूमिका म्हणजे *शेवंता*……!! आज दहा वर्षाच्या लहानग्यापासून ते ८० वर्षाच्या वयस्कराच्या ह्रदयावर अजरामर झाली आहे.. *शेवंता* भूमिकेसाठी मला झी मराठीने झी बेस्ट एकट्रेस पुरस्कार देऊन गौरवले आहे…… कुटुंबाच्या सहकार्याने, आईच्या आशीर्वादाने आणि मायबाप रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रेमामुळे मी आजही तुमच्या मनात रुतून बसलेली आहे….!
कलेला परमेश्वर मानणारी मी शांत बसेल तर ती अपूर्वा कसली लॉकडाऊन काळातही ” *अशी मी? तशी मी ?कशी मी?* ” होऊन यूट्यूब चैनल वर कार्यरत राहिले…कारण कलेचे बाजीगर जिवंत ठेवणारे कलाकारांचे सौदागर जोपर्यंत कोंदण तयार करणार नाहीत.. तोपर्यंत कलेची रत्ने कोंदणावीणा पडून राहतील..आणि माझ्यासारखं कोंदण नव्या उमेदीने तयार होईल…आणि तुमची सेवा करण्याचं बळ मला मिळेल हाच आशावाद मनात ठेवून ” *तुझं माझं जमतय* ही सीरिअल संपून आता ” *रात्रीस खेळ चाले भाग ३*” मधून तुमच्या सेवेत आलेली आहे….!!!
माझ्या या सांस्कृतिक सेवेची २०११ ते २०२१ दशकपूर्ती ३० मे ला पूर्ण होत आहे.. त्यानिमित्ताने माझा फिल्मसृष्टीतल्या प्रवास तुमच्या समोर मांडून तुमच्याशी हितगूज केलं भविष्यात आपलं प्रेम माझ्या पाठीशी नक्की राहील आपल्या दिलखुलास प्रेमळ उल्हासित नजरकैदेत कायमची टिकून राहण्याचा प्रयत्न करेन, त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तोच आशावाद पुढे ठेवून पुढे पाऊल ठेवते…अगदी तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या भरवश्यावर तुमची लाडकी……..
*शेवंता*!!!!!!
म्हणजेच
*अपूर्वा सुभाष नेमळेकर* !
( फेसबुकच्या सहकार्याने )