अर्थसंकल्प २०२१

महाविकास आघाडी सरकारकडून आज विधिमंडळात राज्याच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला

अर्थसंकल्प २०२१

अजित पवार यांनी प्रथम कोविंड योद्ध्यांचे आभार मानले
कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आल्याचे नमूद केले तसेच कोरोना मुळे सर्व क्षेत्रातील आरोग्य सेवा सुधारित करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने ७ हजार ५०० कोटींचा प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण करण्यात येईल तसेच त्या प्रकल्पात जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, मनपा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मनोरुग्णालय यांचे बांधकाम तसेच नवीन रुग्णालयांचे बांधकाम यात समाविष्ट आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात कोविड उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले
अल्पसंख्यांक विभागासाठी ५८९ कोटी, इतर मागास विभाग व बहुजन विकास विभागासाठी ३२१० कोटी,
आदिवासी विकास विभागा साठी ९७३८ कोटींची तरतूद

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी सरकारची मोठी घोषणा

राज्यातील आठ प्राचीन मंदिरांचा विकासासाठी १०१ कोटींची तरतूद

पुण्यात साखर संग्रहालय उभारणार

पर्यटन विभागाला १ हजार ३६७ कोटींची तरतूद

महाबळेश्वर-पाचगणी आणि लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा तयार

गृह विभागाला १७१२ कोटी

राज्यात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक तीन लाख रोजगार निर्माण होणार

नगर विकास विभागाला ८४२० कोटींची तरतूद

मिठी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प ४५० कोटींचा खर्च, मार्च पासून कामाला सुरुवात. मुंबईतील इतर नद्यांबाबत अभ्यास

हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटींच्या खर्चाला मान्यता

सर्वच १४ मेट्रो लाइन्स पूर्ण होण्याच्या टप्प्यावर

किनारी मार्ग २०२४ पूर्वी पूर्ण करणार, ठाणे खाडीला समांतर कोस्टल रोड साठी १२५० कोटींचा खर्च

अपेक्षित पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाला २५३३ कोटी

उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागासाठी १३९१ कोटी

घरकुल योजनेसाठी ६८०० कोटींची तरतूद

चिपी विमानतळ सुरू करण्याचे काम अखेरच्या टप्प्यात

ठाणे आणि पुण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प

पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे काम झपाट्याने होणार २३५ किमी लांबीचा मार्ग १६१३९ कोटींचा खर्चाला कॅबिनेटची मंजुरी

सागरी महामार्गासाठी ९५७३ कोटींचा खर्च

मदत आणि पुनर्वसन विभागासाठी १३९ कोटी

जलसंपदासाठी १२९८१ कोटींची तरतूद

गोसीखुर्द प्रकल्पासाठी १००० कोटी

पणन आणि वस्त्रोद्योग यासाठी १२८४ कोटींचा निधी

औंध येथे रुग्णालय, राज्यात आठ मध्यवर्ती ठिकाणी कार्डियाक लॅब, दीडशे रूग्णालयात कर्करोग निदानासाठी सुविधा देणार.

आरोग्य सुविधांसाठी ७५०० कोटींचा निधी

महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्ज माफी योजना ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना लाभ

२०२१-२२ मध्ये ६६ हजार कोटींची महसुली तूट होणार

सुंदर माझे कार्यालय अभियान राबवणार, यासाठी सामान्य प्रशासन विभागात १०३५ कोटी

ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात आणखीन दहा कोटींची तरतूद

वनविभागास १७२३ कोटींची तरतूद तर पर्यावरण विभागात २२७ कोटींची तरतूद

शेततळी, विहिरी यासाठी १२३१ कोटींची तरतूद

नियोजन विभागासाठी ४८६२ कोटी

सतत तीन वर्ष सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मधील मच्छी उद्योगाच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधी

मुंबई पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकल चालवण्यासाठी विशेष मार्गिका बांधणार

पुण्याजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार

युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यात येणार असून या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार

डोंबिवली मीरा भाईंदर कोलशेत या ठिकाणी जेट्टी उभारणार

जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३ हजार कोटींची तरतूद

एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी दोन हजार कोटींच्या योजनेची घोषणा

कृषी पंपाच्या सौर ऊर्जा जोडणी साठी १५०० कोटींचा महावितरणाला निधी

विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी

तीन लाख पर्यंत पिक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज

पूर्व द्रुतगती मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव

समृद्धी महामार्ग लवकरच पूर्ण करण्यासाठी मोठ्या निधीची घोषणा

मुंबई-गोवा सागरी महामार्गासाठी ९७७३ कोटी

सरकारकडून नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती

आरोग्य सेवांसाठी ७५०० कोटींची तरतूद

सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड मध्ये मेडिकल कॉलेज

सातारा, अमरावतीत शासकीय मेडिकल कॉलेज उभारणार

गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार

राज्यातील १२ धरणाच्या बळकटीसाठी ६२४ कोटी

जलसंपदा विभाग साठी १२९१९ कोटी

शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील

३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वर्ग

अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने रोपवाटीका केंद्र

बस स्थानकाच्या विकासा साठी १४०० कोटी रुपयांची तरतूद तर परिवहन विभागासाठी २५७० कोटींची तरतूद

पुणे साठी नव्या रिंग रोडची घोषणा

पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार

चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी २०० कोटी देणार

पशुसंवर्धन मत्स्य विभागास ३७०० कोटी देणार

समृद्धी महामार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण

राज्यातील स्थूल उत्पन्नात आठ टक्के घट

मुंबई नेहरू सेंटर साठी दहा कोटी रुपयांचा निधी

एमपीएससीच्या बळकटी करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची घोषणा

१ मे पासून नागपूर शिर्डी समृद्धी महामार्ग सुरू होणार

२०२१-२२ मध्ये घरकुल योजनेसाठी ६ हजार ८२९ कोटी रुपयांचा निधी

महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

शाळकरी मुलींना एसटीचा प्रवास मोफत

शाळकरी मुलींच्या प्रवासासाठी १५०० हायब्रीड बस

महाराष्ट्रात पहिल्या स्वतंत्र महिला राज्य राखीव दलाची घोषणा

बर्ड फ्लू सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी पुणे येथे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारणार

मद्यावरील व्हॅटमध्ये ६० वरून ६५ टक्के वाढ झाल्याने दारू महागणार

मद्यावरील व्हॅटमध्ये ६० वरून ६५ टक्के वाढ झाल्याने दारू महागणार

हे राज्य सरकारच बजेट होतं की मुंबई महापालिकेचं, अतिशय निराशाजनक अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलंय – भाई जगताप

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns