फडणवीस- “शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी सोडणार नाही”, मुख्यमंत्री-“मग कधी जाताय?”

विधानसभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आम्ही पाच रुपयात पोटभर जेवणाची थाळी देतो, रिकामी थाळी वाजवायला देत नाही. सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला टोला.
सावरकरांना भारतरत्न द्या असे केंद्र सरकारला २०१८ – २०१९ असे दोन वेळा पत्र दिले मात्र अजूनही काही नाही.
महाराष्ट्र कोरोनाचा एकही रुग्ण अथवा मृत्यू लपवलेला नाही. खोटेपणा करणं हे आमच्या रक्तात नाही, बंद दाराआड आम्ही कधी खोटेपणा केलेला नाही.
पाठ थोपटून घ्यायलाही काम करणारी छाती हवी. कोरोना म्हणतो की “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल” कोरोना हा विषाणू आहे त्यामुळे काळजी घ्या ! मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला.
विरोधकांची चर्चा ऐकून मला नटसम्राट आठवला. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होणार नाही, माझं आजोळ मी विसरलो नसून माझं आजोळ माझ्यापासून तोडण्याचा तुमचा विचार मनातून काढून टाका.
फडणवीस म्हणाले “शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी सोडणार नाही” उद्धव ठाकरे म्हणाले “मग कधी जाताय”.
भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये तुमची तेवढी पात्रता नाही. वल्लभभाई पटेल यांचं नाव हटवून नरेंद्र मोदींचे नाव स्टेडियमला दिलं जातं आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मराठी ही छत्रपतींची भाषा विशेष दर्जा द्या म्हणून आम्ही दिल्ली दरबारी जायचं का? मराठी भाषा काय भिकारी आहे का?.
होय आम्ही औरंगाबादच संभाजीनगर करणारच पण तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत हे सांगा. मुख्यमंत्र्यांचा भाजपला सवाल
जिकडे आम्ही कमी पडलो तिकडे जरूर सूचना करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns