भावपूर्ण श्रद्धांजली का? – निर्माता / दिग्दर्शक दीपक कदम यांचे सहकाऱ्यांना आवाहन

*भावपूर्ण श्रद्धांजली का?*

 

निर्माता/दिग्दर्शक दिपक कदम यांनी आपल्या व्यवसायातील मित्र मंडळींना केलेले आवाहन…

थोडे विचित्र वाटेल पण परत एकदा मनमोकळे पणाने बोलतो.
गेल्या काही दिवसात सकाळीच मोबाईल चालू केला की एक धाकधूक असते आज कोण गेले असेल का जवळचे कोणाला श्रद्धांजली द्यावी लागणार ? मित्रांनो जे जवळ वाढले, एकत्र खाल्ले पिलेले, भांडलेले सुखदुःखात हसणारे रडणारे कामासाठी एकत्र स्ट्रगल करणारे, एक कटींग चाय अर्धा अर्धा करून पिणारे आपले मित्र असे आकस्मात जीवनाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतात… का तर कामाचे टेंशन घेऊन दारूच्या आहारी जातात बियर वरून चालू झालेला प्रवास गावठी वर येऊन केव्हा थांबतो कळतच नाही आणि मग सुरू होतो जीवनाचा शेवटचा प्रवेश,आणि *ब्लॅकआउट*
आपण जेव्हा या क्षेत्रात येतो तेव्हा आपण काय करू शकत नाही म्हणून येत नाही तर आपल्याला काहीतरी करायचे असते म्हणून येतो.आपण कलावंत रंगकर्मी ही बिरुदावली स्वतःच्या नावा समोर लावतो.
मित्रांनो स्वतःला ओळखा आपण देव नसलो तरी देवापेक्षा कमी नाही कारण आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट निर्माण करतो तेव्हा लोकांना स्वतःला विसरून त्या आपल्या जगात हसायला रडायला भावना व्यक्त करायला प्रेम द्यायला किंवा घ्यायला शिकवतो सर्वसामान्य माणूस आपल्या कडे बघून जगतो हसतो रडतो मग आपण किती ग्रेट आहोत याची जाणीव आहे का आपल्याला
जगाची निर्माता जर ब्रम्हदेव असेल तर आम्ही पण त्याने निर्माण केलेल्या माणसाला आमच्या जगात थोड्या वेळा साठी का होईना घेऊन जातो त्याला व्यक्त व्हायला लावतो म्हणजे आम्ही ही त्या निर्मात्या पेक्ष्या कमी नाही आहोत स्वतःला ओळखा..
कोरोनानं खूप गोष्टी उध्वस्त केल्यात आपली करमणूक चित्रपट सृष्टी सगळ्यात आधी होरपळून निघाली आहे यात त्या ही परिस्थिती आपण सगळ्यांनी लढून एकमेकांना मदत करून वेळ मारून नेली आहे आता परत आपले दिवस येत आहेत कोणी ही आततायी पणा करून काम नाही म्हणून व्यसनाच्या आधीन न होता प्लॅनिंग ने कामे करा
घराच्या बाहेर पडला तर बऱ्याच गोष्टी सुटतील मित्रांशी मनातल्या भावना बोला भेटता नाही आले तरी फोन वर संभाषण करा काही नाही म्हणून दारूचा आधार घेऊन एकटेच कुडत बसू नका…कारण आपल्या पहिल्या प्रवेशाची आता तर सुरवात झालीय लोकांचे अजून खूप मनोरंजन करायचे आहे असे समजा
या पुढे कोणाच्याही आकस्मित आत्महत्या किंवा अवेळी जाण्याची दुःखद निधन अशी बातमी ऐकायची नाही आहे आपल्याला..
*तुम्हाला संपवायची ताकत फक्त तुमच्या मध्ये आहे आता ठरावा कोणाकडून श्रद्धांजली वाहून घ्यायची की अभिनंदन मित्रा/मैत्रिणी म्हणून घ्यायचे…..*
मला वाटते अभिनंदन मित्रा/मैत्रिणी हेच आपलं जगण्याचे टॉनिक असेल…
आणि एक अश्या आत्महत्या करून व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या आईवडील बायका पोर मित्रमंडळी यांचा विचार न करता जीवन संपवनार्यांना नाही वाहणार मी श्रद्धांजली..
*म्हणून म्हणतो श्रद्धांजली का???*

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns