“शंभरावे नाट्यसंमेलन ‘न भूतो न भविष्यती’ असे साजरे करा, पैशाची चिंता करू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

“शंभरावे नाट्यसंमेलन ‘न भूतो न भविष्यती’ असे साजरे करा, पैशाची चिंता करू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

“शंभरावे नाट्यसंमेलन आता लवकरच होईल सदरहू संमेलन न भूतो न भविष्यती असे होऊ द्या पैशाची कोणतीही चिंता करू नका शासन व मी स्वतः आपल्या सोबत आहे.” अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्यसंमेलन लवकरच येऊ घातले आहे त्यानिमित्ताने माटुंगा येथील नूतनीकरण झालेल्या यशवंतराव नाट्य संकुल येथे गो ब देवल स्मृतीदिन व पुरस्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील उद्गार काढले. तसेच नाट्य संकुलाच्या पुढील कामकाजासाठी दहा कोटी मंजूर केल्याची घोषणाही केली.

YouTube player

*यशवंत नाट्य संकुल पूर्णपणे तोडून नवीन न बांधता त्यावरतीच काही भाग विस्तारित करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले*

मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. ही सगळी मोठी माणसं असून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यांचा सन्मान करता आला हे मी माझे भाग्य समजतो.

महाराष्ट्राला हवेहवेशे वाटणारे प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाले याचा सर्वांना आनंद आहे.

जेव्हा मी नगर विकास मंत्री होतो तेव्हापासून प्रशांत दामले माझ्याकडे एकूणच महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या दुर्दशेबद्दल चिंता व्यक्त करायचे आता ते अध्यक्ष झाले असून मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे आपल्या सर्व मागण्या नक्कीच पूर्ण होतील याची मी ग्वाही देतो.

महाराष्ट्राने कला क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान दिले आहे, या मातीत अन्य प्रांतातील कलाप्रकार रुजले वाढले त्यालाही महाराष्ट्राने प्रेम दिले. शेवटी महाराष्ट्र हे सर्वांना सामावून घेणारे राज्य आहे. मराठी रंगभूमीची परंपरा आपल्या जेष्ठांनी वाढवलेली आहे टिकवलेली आहे तसेच जोपासली सुद्धा आहे.

महाराष्ट्र हे नाट्यपंढरी असून रसिक मायबाप हा विठ्ठल आहे तर नाट्यगृह हे मंदिर आहे. त्यामुळे या नाट्य मंदिरासमोर अनंत अडचणी आहेत काही त्रुटी देखील आहेत. त्या प्रामाणिकपणे सुटाव्यात यासाठी मी तसेच शासन खंबीरपणे उभे आहोत.

*महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह हे एका छता खाली आणून एक आय एस ऑफिसर नेमून त्याच्या कडून नक्की काय करावे लागेल याचा अंदाज घेऊन ते पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू.*

IPRoyal Pawns