२६ मे २०२०, म॔गळवार बातम्या

२६ मे २०२०, म॔गळवार बातम्या

– शरद पवारांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

– कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचा ‘ठाकरे’ सरकारवर हल्लाबोल.

– रेल्वे मंत्रालयानं महाराष्ट्राकडे मजुरांच्या याद्या मागत बसू नये, खासदार संजय राऊत यांचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना प्रत्युत्तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथांनाही टोला.

– यूपीच्या मजुरांना महाराष्ट्रात येण्यास परवानगी घ्यावी लागेल, योगी आदित्यनाथांच्या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक.

– देशात 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती.

– लॉकडाऊननंतर आजपासून पहिल्यांदाच विमानांचं उड्डाण, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत विमानसेवा सुरू, बंगळुरूत 5 वर्षीय चिमुकल्याचा एकट्यानं प्रवास.

– कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी, गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद.

– महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री कोरोनाबाधित, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण.

– कोरोनाच्या संकटात उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात लाटेचा इशारा.

– मुंबई, मालेगाव, औरंगाबादसह राज्यभरात रमजान ईदचा नमाज अदा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन, सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns