बातम्या २४ मे २०२०, रविवार.

 

– ऑगस्ट महिन्याआधी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याची शक्यता, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती.

– अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय राज्यपालांच्या इच्छेनुसारच, खासदार संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट.

– मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात आढावा बैठक, शरद पवार ट्रेनसंदर्भात पुन्हा मागणी करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी बोलत असल्याची मंत्री जयंत पाटील यांची माहिती.

– देशात 24 तासांत तब्बल 6 हजार 654 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा सव्वालाख पार, तर मुंबईसह महाराष्ट्रातही सर्वाधिक वाढ.

– नागपुरातल्या रामनगर कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक रस्त्यावर, 14 दिवसांत एकही नवा रूग्ण नसताना कंटेन्मेंट झोनमध्येच ठेवल्यानं संताप.

– मुंबईतील NSCI डोमचं कोविड रुग्णालयात रुपांतर, कोविड रुग्णालयात मोबाईल व्हॅनदेखील उपलब्ध, झेव्हियर्स कॉलेजमध्ये 180 खाटांचं क्वॉरंटाईन सेंटर.

– वसईहून गोरखपूरसाठी निघालेली श्रमिक ट्रेन चक्क ओडिशाला पोहोचली, मजुरांमध्ये संभ्रमावस्था, प्रवाशांच्या मदतीसाठी हालचाली.

– माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकारणातून निवृतीचा निर्णय, उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजनाच्या नावाची घोषणा, निवृत्तीमागचं कारण अस्पष्ट.

– जे.जे. पोलिस स्टेशनमधील 45 पैकी 18 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, कोरोनाला हरवून योद्धे पुन्हा कर्तव्यावर हजर, आणखी 4 पोलिसांचे रिपोर्टही निगेटिव्ह.

– पुण्यातील प्लाझ्मा थेरपीच्या यशस्वी प्रयोगानंतर ICMR इतर रुग्णालयांना परवानगी देण्याच्या तयारीत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns