कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत करोनाबाबतचं निवेदन दिलं. त्यात मास्क व सॅनिटायझरचा वापर वाढल्याने या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतला या दोन्ही गोष्टींची साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पुण्यातील चित्रपटगृह, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून ३० मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही त्यांनी बोलून दाखवला.
पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर इथल्या जीम, थिएटर्स, स्वीमिंग पूलही बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र मॉल, हॉटेल्स रेस्टॉरंट्स बंद ठेवण्यात येणार नसून मात्र तिथे जाणं टाळा. असे मुख्यमंत्रांनी स्पष्ट केले.
खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमच्या पर्यायाचा विचार करण्यास सांगण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सार्वजनिक जत्रा, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांना सरकार परवानगी देणार नाही. पूर्वी दिलेली परवानगीही रद्द करण्यात येणार आहे. ही अधिसूचना मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
चीन, द. कोरिया, इटली, जर्मनी, फ्रान्स, इराण हे सात देश केंद्र सरकारच्या यादीत असून अमेरिका आणि दुबईचा समावेशही या यादीत करवा अशी सूचना मुख्यमंत्रांनी केंद्राला केली आहे.