आजवर रोमियो-ज्युलिएट… हिर-रांझा… लैला-मजनूच्या प्रेमकहाणीची खूप पारायणं झाली पण ‘मल्हार-मायडी’ची प्रेमकथा कुणी ऐकलीये का..? अहो, मग नक्की पहा आपलं मराठमोळं-रांगडं प्रेम ‘इभ्रत’ या आगामी मराठी चित्रपटाद्वारा. रांगडा पण हळव्या मनाचा कुस्तीपटू ‘मल्हार’ म्हणजेच संजय शेजवळ आणि आपल्या सौंदर्याचा तसूभरही गर्व नसलेल्या ‘मायडी’ची म्हणजेच शिल्पा ठाकरेची ही प्रेमकथा ‘आवडी’ या साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर आधारलेली आहे.
”इभ्रत मधील संजयची मल्हार ही व्यक्तिरेखा तितकी गुडी-गुडी नाही तर या मल्हारच्या भूमिकेत अनेक कंगोरे लपले आहेत शिवाय एक कुस्तीपटू साकारण्यासाठी मी सिक्सपॅक अॅब्स ही केलेत की जेणेकरून मल्हारच्या व्यक्तिरेखेला न्याय मिळेल.” असं आपलं मत संजयने व्यक्त केलं.
संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे यांच्यासह सुरेश विश्वकर्मा डॉ.सुधीर निकम, अनिकेत केळकर, वृषाली हटळकर, राहुल बेलापूरकर आदींनी ‘इभ्रत’मध्ये आपापली भूमिका प्रामाणिकपणे पार पडली असून ‘इभ्रत’ हा चित्रपट प्रेमाची अनोखी परिभाषा मांडेल. इभ्रत’ हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२०ला आपल्या भेटिस येणार आहे.