पंडित रवी शंकर यांचे अनमोल साहित्य सापडले माहीम येथील भंगारात

गीतकार साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातील साहित्य नुकतेच जुहू येथील भंगाराच्या दुकानात सापडले होते आता लेखक एस एम एम औसाजा यांना माहीम येथील रद्दीच्या दुकानात चित्रपटाची जुनी पोस्टर शोधत असतांना एका जुन्या लेदरच्या सुटकेस मध्ये भारतरत्न सितार मास्टर पंडित रवी शंकर यांची दुर्मिळ छायाचित्रे, पत्रे, वृत्तपत्र कात्रण, टिपण, स्वाक्षरी वही, तसेच त्यांची पहिली पत्नी अनुपमादेवी ( रोशन आरा खान – उस्ताद अल्लादिन खान यांची मुलगी ) यांची छायाचित्रे सापडल्याने लेखक औसाजा अवाक झाले आहेत.
पंडित रविशंकर यांच्या संगीतकाराचा मुलगा शुभो ज्यांचे 1992 साली निधन झाले ही मालमत्ता त्यांची असावी असे वाटत असल्याचे समजते.
मात्र अश्या प्रकारे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा अनमोल ठेवा भंगाराच्या दुकानात सापडावा या सारखे दुसरे दुर्दैव्य ते काय?

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns